थलपती विजयवर दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन, मुलगा गळ्यात पडून रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:44 IST2026-05-07T11:43:08+5:302026-05-07T11:44:22+5:30

एकीकडे आनंदाचा क्षण असताना मात्र दुसरीकडे थलपती विजयवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

thalapathy vijay tribute to producer rb chaudhary son cry emotional moment | थलपती विजयवर दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन, मुलगा गळ्यात पडून रडला

थलपती विजयवर दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन, मुलगा गळ्यात पडून रडला

साऊथ स्टार थलपती विजयने तामिळनाडूच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला. त्याचा टीव्हीके पक्ष लवकरच तामिळनाडूत सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. पण, एकीकडे आनंदाचा क्षण असताना मात्र दुसरीकडे थलपती विजयवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. साऊथ सिनेसृष्टीतील निर्माते आरबी चौधरी यांचं मंगळवारी(५ मे) कार अपघतात निधन झालं. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत थलपती विजयने अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. 

थलपती विजय आणि निर्माता आरबी चौधरी यांचं खूप जवळचं नातं होतं. आरबी चौधरी यांच्या निधनानंतर थलपती विजयने त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. आरबी चौधरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर फुलांचा हार अर्पण करत थलपति त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांच्या मुलाचं सांत्वन त्याने केलं. थलपती विजयला पाहताच आरबी चौधरी यांचा मुलगा भावुक झाला. थलपती विजयच्या गळ्यात पडून तो ढसाढसा रडला. तर त्याला पाहून थलपती विजयलाही अश्रू अनावर झाल्याचं दिसलं. 

आरबी चौधरी यांचं मंगळवारी राजस्थान येथील उदयपूरमध्ये झालेल्या कार अपघातात दु:खद निधन झालं. त्यांच्या निधनाने साऊथ सिनेसृष्टी आणि कलाकारही शोकसागरात बुडाले. तर कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का होता. सोशल मीडियावरुन कलाकारांनी आरबी चौधरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

Web Title : थलपति विजय पर दुखों का पहाड़; बेटे का रो-रोकर हुआ बुरा हाल।

Web Summary : थलपति विजय निर्माता आरबी चौधरी के निधन पर शोक में डूबे। सड़क दुर्घटना में चौधरी का निधन हो गया। विजय ने चौधरी के परिवार को सांत्वना दी। अंतिम संस्कार में चौधरी का बेटा विजय की बाहों में फूट-फूट कर रोया।

Web Title : Thalapathy Vijay Mourns Loss; Son Cries in His Arms.

Web Summary : Thalapathy Vijay mourns the death of producer RB Choudary, who died in a car accident. Vijay consoled Choudary's family. Choudary's son broke down in Vijay's arms at the funeral.