अल्लू अर्जुन इन्स्टाग्रामवर फक्त 'या' एका व्यक्तीला करतो फॉलो; पाहा कोण आहे 'पुष्पा'चं फेवरेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 10:37 IST2024-04-09T10:34:59+5:302024-04-09T10:37:53+5:30
'या' एकमेव व्यक्तीला फॉलो करतो सुपरस्टार अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन इन्स्टाग्रामवर फक्त 'या' एका व्यक्तीला करतो फॉलो; पाहा कोण आहे 'पुष्पा'चं फेवरेट
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन जगभरात लोकप्रिय झाला आहे. 'पुष्पा' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या या अभिनेत्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांद्वारे इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अल्लू अर्जुनने आपल्या डायलॉग्स आणि हुक स्टेपने सर्वानांच वेड लावलं आहे. अल्लू अर्जुन फक्त भारतात स्टार राहिलेला नाही तर ग्लोबल स्टार बनलाय. आपल्या फिल्मी करीअर आणि पर्सनल लाईफमुळे नेहमीच लाईमलाईटमध्ये अल्लू अर्जुन राहतो. अल्लू अर्जुन सोशल मीडियावरही तो सक्रिय असतो.
जर तुम्ही अल्लू अर्जुन इन्स्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की, अल्लू अर्जुनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. मात्र, अल्लू अर्जुन इन्स्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची पत्नी स्नेहा रेड्डी आहे. अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर आतापर्यंत 610 पोस्ट केल्या आहेत. तर त्याचे इन्स्टाग्रामवर 25.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. इतके फॉलोअर असलेला तो एकमेव तेलुगू अभिनेता आहे.
प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांमध्ये अल्लू अर्जुनचा समावेश होतो. 'पुष्पा' या गाजलेल्या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी प्रेक्षकांनाही प्रभावित केलं. अल्लू अर्जुने पडद्यावर रंगवलेली बहुतांश पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे. गेल्या 20 वर्षांपासून अल्लू अर्जुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पारुगु, जुलाई, रेस गुर्रम, एस ओ सत्यमूर्ती, सर्रेनोडू असे सुपरहिट सिनेमे त्याने इंडस्ट्रीला दिले. रोमँटिक भूमिकांबरोबरच त्याने डॅशिंग हिरोच्या भूमिकाही एकदम चोख निभावल्या. एकेकाळी 3 हजारात काम करणारा अल्लू अर्जुन आता कोट्यधीश आहे.