Allu Arjun Arrested: 'पुष्पा २' अभिनेता अल्लू अर्जुनला झाली अटक, संध्या थिएटर केस प्रकरणात पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:08 IST2024-12-13T13:07:14+5:302024-12-13T13:08:05+5:30

Allu Arjun Arrested: अल्लू अर्जुनच्या अटकेचा व्हिडिओही समोर

Pushpa 2 actor Allu Arjun arrested hyderabad police took action in Sandhya Theater stampede case | Allu Arjun Arrested: 'पुष्पा २' अभिनेता अल्लू अर्जुनला झाली अटक, संध्या थिएटर केस प्रकरणात पोलिसांची कारवाई

Allu Arjun Arrested: 'पुष्पा २' अभिनेता अल्लू अर्जुनला झाली अटक, संध्या थिएटर केस प्रकरणात पोलिसांची कारवाई

Allu Arjun Arrested: दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनलापोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नुकताच त्याचा 'पुष्पा २: द रुल' सिनेमा रिलीज झाला. सिनेमाच्या रिलीजआधी अभिनेत्याने अनेक ठिकाणी जोरदार प्रमोशन केलं. मात्र काही ठिकाणी जमलेल्या गर्दीमुळे एक-दोन जणांचा मृत्यू झाला. यामुळे सिनेमाच्या लोकप्रियतेला गालबोट लागलं. त्यातलीच एक घटना म्हणजेच हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेली गर्दी. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता अल्लू अर्जुनला तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. यामध्ये तो पोलिसांशी बोलताना दिसतोय. त्याच्यासोबत त्याची पत्नीही आहे. चर्चा झाल्यानंतर पोलिस त्याला ताब्यात घेत आहेत. संध्या थिएटरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

अल्लू अर्जुनची साऊथमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यातच त्याच्या 'पुष्पा' सिनेमाचा भलामोठा चाहतावर्ग आहे. साऊथमध्ये अनेक ठिकाणी सिनेमाच्या टीमने जोरदार प्रमोशन केलं होतं. ५ डिसेंबरला 'पुष्पा २' रिलीज झाला. त्याच्या आदल्या दिवशी हैदराबाद येथील संध्या थिएटमध्ये सिनेमाचा प्रीमियर झाला होता. यावेळी एक दुर्घटना घडली. दिलसुखनगर येथे राहणारी महिला रेवती तिचे पती भास्कर आणि दोन मुलं श्रीतेज (९) आणि संविका (७) यांच्यासोबत 'पुष्पा 2'च्या प्रिमियरला उपस्थित होती. प्रिमियरच्या वेळेस गर्दीत असलेल्या लोकांनी गेट तोडण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ झालं. चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याने यात रेवती आणि तिचा मुलगा श्रीतेज बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी रेवती यांना मृत घोषित केलं.

Web Title: Pushpa 2 actor Allu Arjun arrested hyderabad police took action in Sandhya Theater stampede case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.