अभिनेत्याने केलं दुसरं लग्न, १९ वर्षांची आहे लेक; पहिल्या बायकोला माहितीच नाही, म्हणते- "ती माझ्या मुलीपेक्षा २ वर्षांनीच मोठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 10:38 IST2026-01-23T10:36:37+5:302026-01-23T10:38:04+5:30

बंगाली अभिनेता आणि भाजपा नेता असलेले हिरेन चॅटर्जी चर्चेत आले आहेत. हिरेन यांनी ४८व्या वर्षी मॉडेल असलेल्या रितिका गिरीसोबत दुसरं लग्न केलं आहे.

hiran chatterjee 2nd marriage with model ritika giri first wife reacted | अभिनेत्याने केलं दुसरं लग्न, १९ वर्षांची आहे लेक; पहिल्या बायकोला माहितीच नाही, म्हणते- "ती माझ्या मुलीपेक्षा २ वर्षांनीच मोठी..."

अभिनेत्याने केलं दुसरं लग्न, १९ वर्षांची आहे लेक; पहिल्या बायकोला माहितीच नाही, म्हणते- "ती माझ्या मुलीपेक्षा २ वर्षांनीच मोठी..."

बंगाली अभिनेता आणि भाजपा नेता असलेले हिरेन चॅटर्जी चर्चेत आले आहेत. हिरेन यांनी ४८व्या वर्षी मॉडेल असलेल्या रितिका गिरीसोबत दुसरं लग्न केलं आहे. सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत त्यांनी लग्नाबाबत चाहत्यांना माहिती दिली. मात्र त्यानंतर त्यांनी फोटो डिलीट केले. त्यांच्या या लग्नाने खळबळ उडाली आहे. हिरेन यांना पहिली पत्नी अनिंदितापासून १९ वर्षांची मुलगी असून त्यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीने आरोप केले आहेत. घटस्फोट झाला नसल्याने हे दुसरं लग्न अवैध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

आजतकशी बोलताना अनिंदिता यांनी हिरेन यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सोशल मीडियावरुनच कळाल्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या, "मीदेखील लग्नाचे तेच फोटो पाहिले जे तुम्ही सगळ्यांनी पाहिले आहेत. हिरेन यांनी २०२१ मध्ये खड़गपूर विधानसभा निवडणुक जिंकल्यानंतर आमच्या नात्यात खटके उडू लागले होते. त्यानंतर वर्षभरातच मला त्यांचं दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचं समजलं होतं. पण सुरुवातीला मी याकडे दुर्लक्ष केलं होतं. ती महिला आमच्या मुलीपेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे हे नातं स्वीकारणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. म्हणूनच मी २०२२ मध्ये हिरेनपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला". हिरेन आणि अनिंदिता यांनी २००० मध्ये लग्न केलं होतं. त्यांना १९ वर्षांची मुलगी आहे. 

हिरेन यांची दुसरी पत्नी रितिकाने सोशल मीडियावर पोस्ट करत अनिंदिताच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. "माझं आणि हिरेनचं लग्न ५ वर्षांपूर्वीच झालंय. आता केलेला हा सोहळा फक्त मानसिक समाधानासाठी आयोजित केला होता. अनिंदिताला घटस्फोटाची कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. जर कोणाला लग्न बेकायदेशीर वाटत असेल तर त्यांनी कायदेशीर पावले उचलावीत", असं तिने म्हटलं आहे. रितिकाने केलेला घटस्फोटाच्या नोटिशीचा दावा अनिंदिता यांनी फेटाळून टावला आहे. 

Web Title : अभिनेता की दूसरी शादी पर विवाद; पहली पत्नी का दावा, तलाक नहीं हुआ।

Web Summary : बंगाली अभिनेता हिरेन चटर्जी की मॉडल से दूसरी शादी पर विवाद छिड़ गया। उनकी पहली पत्नी अनिंदिता का दावा है कि उनका तलाक नहीं हुआ है और नई पत्नी उनकी बेटी की उम्र के करीब है। नई पत्नी का कहना है कि शादी पांच साल पहले हुई थी और तलाक के कागजात भेजे गए थे।

Web Title : Actor's Second Marriage Sparks Controversy; First Wife Claims No Divorce.

Web Summary : Bengali actor Hiren Chatterjee's second marriage to a model ignited controversy. His first wife, Anindita, claims they are not divorced and the new wife is close in age to their daughter. The new wife asserts the marriage occurred five years ago and divorce papers were served.