साऊथ सेलिब्रिटी कपलने लेकीचं नाव ठेवलं 'मियू', काय आहे या जपानी नावाचा अर्थ?

By कोमल खांबे | Updated: May 17, 2026 11:40 IST2026-05-17T11:39:17+5:302026-05-17T11:40:11+5:30

साऊथ सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी कपल असलेले दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार आणि त्याची पत्नी प्रिया काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आईबाबा झाले. आता आपल्या मुलीच्या नावाचा खुलासा त्यांनी केला आहे. या कपलने आपल्या चिमुकल्या लेकीचं नाव “मियू” (Miyou) ठेवलं आहे.

atlee kumar and priya named her baby girl miyou know the meaning of japanese name | साऊथ सेलिब्रिटी कपलने लेकीचं नाव ठेवलं 'मियू', काय आहे या जपानी नावाचा अर्थ?

साऊथ सेलिब्रिटी कपलने लेकीचं नाव ठेवलं 'मियू', काय आहे या जपानी नावाचा अर्थ?

साऊथ सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी कपल असलेले दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार आणि त्याची पत्नी प्रिया काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आईबाबा झाले. अ‍ॅटली आणि प्रिया यांना कन्यारत्न झाले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता आपल्या मुलीच्या नावाचा खुलासा त्यांनी केला आहे. या कपलने आपल्या चिमुकल्या लेकीचं नाव “मियू” (Miyou) ठेवलं आहे.

अ‍ॅटली आणि प्रियाने एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोवर “एक छोटंसं बाळ, ज्याने आमच्या हृदयात सर्वात मोठी जागा निर्माण केली आहे,” असा भावनिक संदेश लिहिलेला आहे. पोस्ट शेअर करताना कपलने असंही लिहिलं की आता त्यांच्या प्रेमाच्या प्रतीकाला एक सुंदर नाव मिळालं आहे. त्यांनी या जपानी नावाचा खास अर्थही सांगितला आहे. ‘मियू’ म्हणजे सौंदर्य, कोमलता आणि प्रेमाचं प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


अ‍ॅटली कुमार हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहे. 'थेरी','आ २','बिगिल' अशा गाजलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन त्याने केलं आहे. साऊथसोबतच जवान, बेबी जॉन या बॉलिवूड सिनेमांचं दिग्दर्शनही अ‍ॅटलीने केलं आहे. २०१४ मध्ये अ‍ॅटली आणि प्रियाने लग्न करत संसार थाटला. २०२३ मध्ये प्रियाने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर २० एप्रिलला त्यांच्या आयुष्यात लक्ष्मीचं आगमन झालं. 

Web Title : एटली कुमार और प्रिया ने बेटी का नाम मियू रखा; अर्थ का खुलासा।

Web Summary : दक्षिण के मशहूर जोड़े एटली कुमार और प्रिया ने अपनी बेटी का नाम मियू रखा, जो एक जापानी नाम है जिसका अर्थ है सौंदर्य, कोमलता और प्रेम। जोड़े ने सोशल मीडिया पर खबर साझा की, प्रशंसकों ने उन्हें बधाई दी। एटली दक्षिण सिनेमा में एक लोकप्रिय निर्देशक हैं।

Web Title : Atlee Kumar and Priya name daughter Miyou; meaning revealed.

Web Summary : South celebrity couple Atlee Kumar and Priya named their daughter Miyou, a Japanese name meaning beauty, tenderness, and love. The couple shared the news on social media, with fans showering them with congratulations. Atlee is a popular director in South cinema.