'अॅनिमल'नंतर बॉबी देओल पुन्हा एकदा व्हिलनच्या भूमिकेत, 'कंगुआ'मधील थरकाप उडवणारा लूक चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 13:35 IST2024-01-27T13:35:04+5:302024-01-27T13:35:46+5:30
Bobby Deol : 'कंगुआ'मधील बॉबी देओलचा व्हिलन लूकमधली पहिली झलक समोर आली आहे. याआधी या चित्रपटातील अभिनेता सुर्याचे पोस्टर रिलीज झाले होते आणि त्याला खूप प्रशंसा मिळाली होती. बॉबीचा लूक पाहून या चित्रपटाच्या टीझरची लोकांची प्रतीक्षा वाढली आहे.

'अॅनिमल'नंतर बॉबी देओल पुन्हा एकदा व्हिलनच्या भूमिकेत, 'कंगुआ'मधील थरकाप उडवणारा लूक चर्चेत
अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) 'अॅनिमल' (Animal Movie) चित्रपटामुळे सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटात त्याने साकारलेली ग्रे शेड भूमिका लोकांना खूपच भावली. चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला आहे. तरीदेखील या चित्रपटातील त्याच्या कामाची चर्चा होते आहे. दरम्यान आता तो आणखी एका चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारणार आहे. तो साऊथचा चित्रपट 'कंगुआ'(Kanguva)मध्ये निगेटिव्ह भूमिका करणार आहे. यातील त्याचा लूक समोर आला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
'कंगुआ'मधील बॉबी देओलचा व्हिलन लूकमधली पहिली झलक समोर आली आहे. याआधी या चित्रपटातील अभिनेता सुर्याचे पोस्टर रिलीज झाले होते आणि त्याला खूप प्रशंसा मिळाली होती. बॉबीचा लूक पाहून या चित्रपटाच्या टीझरची लोकांची प्रतीक्षा वाढली आहे. या चित्रपटात बॉबी देओल ज्या खलनायकाची भूमिका साकारणार आहे त्याचे नाव उधीरन आहे. या पोस्टरमध्ये उधीरनचे केस लांब असून त्याच्या कपाळावर रेनडिअर हॉर्नसारखा मुकुट दिसत आहे. आजूबाजूला पाहिले तर फक्त त्याच्या टोळीचे लोकच दिसत आहेत आणि पोस्टर बघून असे दिसते की हे लोकही आपल्या राजावर प्रेम करतात.
बॉबी देओलचा लूक पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत की एकाने तर म्हटले की, आम्ही अद्याप 'अॅनिमल'मधून बाहेर पडू शकलो नाही की तुम्ही हे पोस्ट केले आहे. एकाने लिहिले की कॉलिवुडमध्ये तुमचे स्वागत आहे सर. दुसरा चाहता म्हणाला, आजपर्यंतचा सर्वात खतरनाक खलनायक. तथापि, काही लोक अजूनही 'आश्रम' या वेब सीरिजमधला त्याचा प्रसिद्ध संवाद असलेल्या जपानामवर मात करू शकले नाहीत. एका चाहत्याने लिहिले, आजपर्यंत आम्ही कोणाचाही असा लूक पाहिला नाही.
मेगास्टार सूर्याच्या आगामी 'कंगुवा' चित्रपटात दिशा पटानी
मेगास्टार सूर्याचा आगामी चित्रपट 'कांगुवा' जगभरातील ३८ भाषांमध्ये वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये रिलीज होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 'कंगुवा' हे शिव दिग्दर्शित करत असून यामध्ये सूर्या आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत. २०२४ च्या उन्हाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.