३८ वर्षीय अभिनेत्रीने ११ वर्षांनी मोठ्या 'बाबा'सोबत केलं दुसरं लग्न; लेकीची होती अशी प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:14 IST2025-07-31T12:13:56+5:302025-07-31T12:14:51+5:30
३८ वर्षीय अभिनेत्रीने दुसरं लग्न केल्याची खूप चर्चा झाली होती. अभिनेत्रीच्या दुसऱ्या लग्नावर तिच्या मुलीने काय प्रतिक्रिया दिली बघा

३८ वर्षीय अभिनेत्रीने ११ वर्षांनी मोठ्या 'बाबा'सोबत केलं दुसरं लग्न; लेकीची होती अशी प्रतिक्रिया
भारतीय मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे दिव्या श्रीधर. वयाच्या ३८ व्या वर्षी दिव्याने क्रिस वेणुगोपालसोबत लग्न केलं. क्रिस दिव्यापेक्षा ११ वर्षांनी मोठा असून ते ४९ वर्षांचे आहेत. प्रेमाला वयाचं बंधन नसतं म्हणतात ते खरंच. दोघांच्या वयात ११ वर्षांचं अंतर आहे. काही महिन्यांपूर्वी केरळ येथील गुरुवायूर मंदिरात त्यांनी पारंपरिक थाटात लग्न केलं. क्रिसचा लूक पाहून तो कोणीतरी धार्मिक बाबा आहे, अशी चर्चा झाली. याशिवाय आईच्या दुसऱ्या लग्नावर लेकीनेही खास प्रतिक्रिया दिली
कोण आहे दिव्याचा दुसरा पती क्रिस
दिव्याने जेव्हा क्रिससोबत दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या. याशिवाय क्रिसची वाढलेली पांढरी दाढी बघून तो कोणी धार्मिक बाबा आहे, असाही खुलासा झालाय. पण क्रिस हा सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. दिव्या आणि क्रिस दोघंही दक्षिणेतील मालिका विश्वात प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती, विशेषतः त्यांच्यातील वयाच्या फरकामुळे. मात्र दिव्याने स्पष्ट केलं की, “माझ्यासाठी वय महत्त्वाचं नाही. मला समजूतदार, प्रेमळ आणि जबाबदारी घेणारा नवरा हवा होता.”
तिने असंही सांगितलं की, “आजकाल अनेक नाती टिकत नाहीत. मी विचारपूर्वक निर्णय घेतला. क्रिस माझ्या मुलांना सुद्धा आपलीच मुलं समजतो, आणि हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.” आईने केलेलं दुसर लग्न दिव्याच्या मुलीनेही स्वीकारलं. तिने आईच्या निर्णयाला पाठिंबा दिला. क्रिस वेणुगोपाल हा केवळ अभिनेता नाही तर लेखक, रेडिओ जॉकी आणि व्हॉइस आर्टिस्ट सुद्धा आहेत. त्याच्याकडे पीएचडी आणि कायद्याची पदवी आहे. दिव्याच्या मुलीचाही क्रिस आदर करुन तिच्या शिक्षणाला सपोर्ट करताना दिसतो.