स्मृती इराणी करणार शूटिंग

By Admin | Updated: June 4, 2014 09:09 IST2014-06-04T09:09:56+5:302014-06-04T09:09:56+5:30

अभिनयानंतर राजकारणातही यशस्वी ठरलेल्या स्मृती इराणी आता केंद्रीय मंत्री आहेत. आता त्यांच्या वेळेनुसार चित्रपटांच्या तारखा ठरवल्या जात आहेत.

Shooting in memory of Irani | स्मृती इराणी करणार शूटिंग

स्मृती इराणी करणार शूटिंग

अभिनयानंतर राजकारणातही यशस्वी ठरलेल्या स्मृती इराणी आता केंद्रीय मंत्री आहेत. आता त्यांच्या वेळेनुसार चित्रपटांच्या तारखा ठरवल्या जात आहेत. स्मृती सध्या ‘आॅल इज वेल’ नावाच्या एका चित्रपटात काम करीत आहेत. या चित्रपटातील त्यांचे काही सीन्स शूट करायचे राहिले आहेत. स्मृती यांना वेळ मिळेल तेव्हा त्या हे सीन्स शूट करतील. उमेश शुक्लाचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग सिमला येथे झाले. स्मृती यांनी त्यांचे सिमला येथील काम बरेच आधी संपवले, कारण त्यांना निवडणूक प्रचारासाठी वेळ हवा होता. आता चित्रपटाचे उर्वरित शूटिंग मुंबई येथे होणार आहे. स्मृती येत्या १२ तारखेला चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याची शक्यता आहे.

Web Title: Shooting in memory of Irani