‘सलमान तुझा भाऊ आहे ना?

By Admin | Updated: June 21, 2017 03:46 IST2017-06-21T03:46:09+5:302017-06-21T03:46:09+5:30

सलमान खान आणि किंग शाहरूख खान यांच्यातील मैत्री आणि दुश्मनी कधीच लपून राहिली नाही. एक काळ असा होता की, यांच्यातील दुश्मनी सर्वश्रुत होती.

'Salman is your brother? | ‘सलमान तुझा भाऊ आहे ना?

‘सलमान तुझा भाऊ आहे ना?

सलमान खान आणि किंग शाहरूख खान यांच्यातील मैत्री आणि दुश्मनी कधीच लपून राहिली नाही. एक काळ असा होता की, यांच्यातील दुश्मनी सर्वश्रुत होती. एकमेकांचे तोंडही बघायचे नाही, असा त्यांचा पवित्रा होता. परंतु हळूहळू त्यांच्यात मैत्री फुलू लागली. आता तर दोघेही पक्के मित्र झाले असून, पुन्हा दुश्मनी नको असा जणू काही त्यांनी विचारच केला आहे. अलीकडेच शाहरूख एका ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी गेला असता, एका मुलाने त्याला ‘सलमान तुझा भाऊ आहे ना?’ असे विचारले होते. शाहरूखने या प्रश्नाचे जे उत्तर दिले ते ऐकून तुम्हालाच नव्हे तर दस्तुरखुद्द सलमान खानलाही आश्चर्य वाटेल. शाहरूखने त्या चिमुकल्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, ‘सलमान माझा भाऊच नव्हे तर त्यापेक्षाही तो माझ्यासाठी मोठा आहे.’ शाहरूखचे हे उत्तर खरोखरच कौतुकास्पद असून, त्यांच्या नात्यात आणखी गोडवा आणणारे आहे. वास्तविक बॉलिवूडच्या या दोन्ही स्टार्सनी एकत्र राहावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असली तरी, हे दोघे आता पुन्हा कधी एकमेकांचे दुश्मन होणार नाहीत, हेही तेवढेच खरे आहे.

Web Title: 'Salman is your brother?