बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 09:03 IST2026-05-09T09:01:32+5:302026-05-09T09:03:52+5:30

आजही लोकप्रिय आहे परश्या-आर्चीची जोडी

rinku rajguru and akash thosar aka aarchi and parshya came together for event in mumbai | बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती

बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती

'सैराट' या मराठीतील आयकॉनिक सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाली. या सिनेमामुळे आर्ची-परश्याची जोडी सुपरहिट झाली होती. १० वर्षांनंतर आजही त्यांची जादू कायम आहे. रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर हे दोन्ही कलाकार रातोरात स्टार झाले होते. रिंकू राजगुरु तर अजूनही इंडस्ट्रीत सक्रीय आहे. मात्र आकाश ठोसर नुकताच बऱ्याच वर्षांनी समोर आला आहे. पुण्यातील एका इव्हेंटमध्ये आर्ची-परश्याने हजेरी लावली तेव्हा चाहतेही सैराटच्या आठवणीत रमले. 

निर्मात्या, उद्योजिका उषा काकडे यांच्या नातवाचं बारसं पुणे येथे थाटात झालं. या कार्यक्रमाला फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी उपस्थिती लावली होती. मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं ते आर्ची आणि परश्याने. रिंकू गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करुन आली होती. यात ती खूप सुंदर दिसत होती. शॉर्ट हेअरकट तिला शोभून दिसत होता. तर आकाश व्हाईट शर्ट, जीन्स अशा कूल लूकमध्ये आला होता. दोघांनी उषा काकडेंसोबत कॅमेऱ्यासमोर पोज दिली. नंतर फक्त रिंकू आणि परश्याची कॅमेऱ्यासमोर धमालमस्ती दिसली. रिंकूने गंमतीत आकाशला नमस्कार असं म्हटलं आणि आकाशनेही तेच केलं. नंतर दोघांनी हसतच पापाराझींकडे पाहिलं.


यानंतर रिंकू राजगुरुने रात्री एक स्टोरी शेअर केली. ज्यात ती आकाशसोबत धमाल मस्ती करताना दिसत आहे. 'लेट नाईट फन' असं कॅप्शन तिने दिलं आहे. दोघांनी पुन्हा अशा प्रकारे एकत्र पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सैराट सिनेमावेळी रिंकू आणि आकाश दोघंही लहान होते. खूप कमी वयात त्यांना कमालीचं यश मिळालं. नंतर दोघांनी मराठीच नाही तर हिंदीतही भूमिका साकारल्या. त्यात आकाश ठोसर बऱ्याच दिवसांनी समोर आला. रिंकू सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते मात्र आकाश सोशल मीडियावरही दिसत नाही. 
 

Web Title : लंबे समय बाद 'सैराट' स्टार रिंकू राजगुरु और आकाश ठोसर का पुनर्मिलन

Web Summary : रिंकू राजगुरु और आकाश ठोसर, 'सैराट' फेम, पुणे में एक कार्यक्रम में फिर से मिले। आर्ची और परश्या के रूप में अपनी भूमिकाओं के लिए मशहूर इस जोड़ी ने एक साथ पोज़ दिया, और अपनी प्रतिष्ठित फिल्म की सफलता को याद किया। रिंकू ने आकाश के साथ मजेदार पल साझा किए, जिससे प्रशंसक खुश हो गए।

Web Title : Sairat stars Rinku Rajguru and Akash Thosar reunite after long time.

Web Summary : Rinku Rajguru and Akash Thosar, 'Sairat' fame, reunited at an event in Pune. The duo, celebrated for their roles as Archi and Parshya, posed together, reminiscing about their iconic film's success. Rinku shared fun moments with Akash, delighting fans.