‘बाजीराव मस्तानी’मधील प्रियंकाचा लूक झाला लीक

By Admin | Updated: October 28, 2014 00:24 IST2014-10-28T00:24:28+5:302014-10-28T00:24:28+5:30

सोशल मीडियावर सध्या प्रियंका चोपडा हिचे एक छायाचित्र मोठय़ा प्रमाणात शेअर केले जात आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या सेटवर प्रियंकाचे हे छायाचित्र घेण्यात आले आहे.

Priyanka's 'Bajirao Mastani' becomes a leaked look | ‘बाजीराव मस्तानी’मधील प्रियंकाचा लूक झाला लीक

‘बाजीराव मस्तानी’मधील प्रियंकाचा लूक झाला लीक

सोशल मीडियावर सध्या प्रियंका चोपडा हिचे एक छायाचित्र मोठय़ा प्रमाणात शेअर केले जात आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या सेटवर प्रियंकाचे हे छायाचित्र घेण्यात आले आहे. या छायाचित्रबरोबरच प्रियंकाचा ‘बाजीराव मस्तानी’मधील लूकदेखील लीक झाला आहे. चित्रपटाबाबात रसिकांची उत्सुकता ताणली जावी, यासाठी प्रियंकाने काही दिवसांपूर्वी टि¦टरवर आपल्या लूकची एक झलक शेअर केली होती. या छायाचित्रत फक्त तिचा हात दिसत होता. त्यानंतर काही दिवसांताच प्रियंकाचा नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला जात होता. संजय लीला भन्साळीच्या ‘बाजीराव मस्तानी’मधील प्रियंकाचा लूक ब:याच अंशी ‘कमीने’ आणि ‘अग्निपथ’ यांच्याशी मिळताजुळता आहे. या दोन्ही चित्रपटांत प्रियंकाने मराठी मुलीची भूमिका साकारली होती. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये ती काशीबाईची भूमिका करणार आहे, तर दीपिका पदुकोन मस्तानी बनणार आहे. बाजीरावच्या भूमिकेसाठी रणवीरसिंहने काही दिवसांपूर्वी डोक्याचा चमनगोटा केला होता.

 

Web Title: Priyanka's 'Bajirao Mastani' becomes a leaked look