Photos: कतरिनाला विसरा पाहा विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 10:13 AM2021-11-07T10:13:39+5:302021-11-07T10:20:18+5:30

Harleen sethi: २०१९ मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला. मात्र, अजूनही त्यांच्या रिलेशनची चर्चा रंगते. त्यातच विकी-कतरिनाच्या लग्नामुळे हरलीनदेखील पुन्हा चर्चेत आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियालवर अभिनेता विका कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. हे दोघंही डिसेंबरच्या अखेरीस राजस्थानमधील एका पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या सोशल मीडियावर जरी विकी आणि कतरिनाच्या अफेअर किंवा लग्नाची चर्चा सुरु असली. तरीदेखील नेटकऱ्यांमध्ये विकीच्या एक्स गर्लफ्रेंडची चर्चा रंगू लागली आहे.

कतरिनाला डेट करण्यापूर्वी विकी अभिनेत्री हरलीन सेठी हिला डेट करत होता. विशेष म्हणजे त्यांचं रिलेशन चांगलं गाजलंही होतं.

२०१९ मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला. मात्र, अजूनही त्यांच्या रिलेशनची चर्चा रंगते. त्यातच विकी-कतरिनाच्या लग्नामुळे हरलीनदेखील पुन्हा चर्चेत आली आहे.

विकी आणि हरलीनमध्ये छान बॉण्डिंग होतं. मात्र, 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाच्या यशानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जातं. याविषयी एका मुलाखतीत हरलीनने तिचं मतही मांडलं होतं.

'उरी'च्या यशानंतर विकीला हरलीनचा विसरल पडला होता', असं तिने या मुलाखतीत सांगितलं होतं. तसंच 'मला कोणाची एक्स गर्लफ्रेंड अशी ओळख नकोय', असंही ती म्हणाली होती.

हरलीन छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही केलं आहे.

हरलीनने केवळ भारतीय नव्हे तर हॉलिवूडमध्येही काम करुन तिच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.

हरलीन सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिचा चाहतावर्गदेखील तितकाच मोठा असल्याचं पाहायला मिळतं.

'ब्रोकेन बट ब्यूटीफुल' या वेब सीरिजमध्येही ती झळकली आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत विक्रांत मेस्सीने स्क्रीन शेअर केली आहे.