Vanita Kharat : ओलेचिंब होत केले LIPLOCK, हास्यजत्रा फेम वनिता खरातचे प्रिवेडिंग फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 09:57 AM2023-01-22T09:57:06+5:302023-01-22T10:04:42+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिचे बोल्ड प्रिवेडिंग फोटोशूट आता चांगलेच चर्चेत आहे.

'महाष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री वनिता खरात सध्या प्रचंड आनंदात आहे.यंदा वनिताचे शुभमंगल असल्याने तिच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

वनिता खरातने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या दिवशी जाहिररित्या प्रेमाची कबुली दिली होती. आता दोघेही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लग्नबंधनात अडकत आहेत.

सुमित लोंढे असे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. २०२२ वर्ष संपत असतानाच दोघांनी जाहीरपणे आपल्या प्रेमाच्या नात्याची कबुली दिली होती. दोघांनी जोडीने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

तर वनिताने नुकताच प्रिवेडिंग फोटोशूटमधील एक खास फोटो शेअर केला आहे. त्यात दोघेही ओलेचिंब झाले आहेत आणि kiss करताना दिसत आहेत. वनिताने अबोली रंगाची साडी नेसली आहे तर पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तर सुमितने पांढरा शर्ट घातला आहे.

वनिता नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. काहीतरी हटके करताना ती तिच्या वजनाचा किंवा कोणताच विचार ती करत नाही हे अनेकदा चाहत्यांनी बघितले आहे.

'गुपित मौनांचे नजरेस कळावे, ओठांचे मग चुंबन व्हावे !' असे गोड कॅप्शन वनिताने या खास फोटोला दिले आहे. तर आता लग्नाला ११ दिवसच राहिले असल्याचं तिने स्पष्ट केलंय.

वनिता सध्या सोनी मराठी वरील पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेत राधा मावशी ही भूमिका साकारत आहे. तर सुमित लोंढे हा व्हिडिओ क्रिएटर आहे.

२ वर्षांपूर्वी वनिताने बॉडी पॉझिटिव्हिटी अंतर्गत न्यूड फोटोशूट केले होते. यानंतर ती खूपच चर्चेत आली होती. तिच्या बिंधास्त अॅटिट्यूडचे अनेकांनी कौतुकही केले.

वनिता खूपच गुणी अभिनेत्री असून तिने बॉलिवूडच्या कबीर सिंग सिनेमात साकारलेल्या छोट्या भूमिकेनेही प्रेक्षकांचे मन जिंकले होते. तिचा विनोदी, बोल्ड आणि बिंधास्त स्वभाव अनेकांना भावतो.