'टीव्ही क्वीन' हिना खानच्या ग्लॅमरस लूकने वेधलं साऱ्यांचं लक्ष, पाहा अभिनेत्रीचं Breathtaking Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 14:20 IST2024-06-25T14:06:47+5:302024-06-25T14:20:15+5:30

हिना खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

हिना खान सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

नुकतंच हिनाने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

फोटोमध्ये हिना ही बॅल्क आऊटफीटमध्ये सुंदर दिसत आहे.

ॲक्सेसरीज म्हणून हिनाने कानात इअररिंग्ज आणि बोटात अंगठ्या घातल्या आहेत.

हिनाने फोटोसाठी विविध पोझ दिल्या आहेत. तिचा हा लूक चाहत्यांना घायाळ करतोय.

हिना खानचा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतो आहे.

टेलीव्हिजननंतर आता हिनाने चित्रपट आणि ओटीटीवर फोकस केला आहे.

'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटामुळे ती चर्चेत आहे. इंग्रजी कादंबरीकार एचजी वेल्स यांच्या कथेवर आधारित या चित्रपटात हिना खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.