करिअर सोडून नवऱ्यासोबत अमेरिकेत गेली, कौटुंबिक हिंसाचाराचा केला सामना; 'ही' अभिनेत्री आठवते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:37 IST2025-02-28T13:05:53+5:302025-02-28T13:37:21+5:30

पहिल्या पतीपासून तिला मुलगा झाला, मात्र अभिनेत्रीने प्रेग्नंसीतच सहन केला छळ

२०११ साली आलेली 'स्टार प्लस'वरची नव्या मालिका आठवतेय? अभिनेत्री सौम्या सेठने (Soumya Seth) यामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. सौम्या प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

नंतर सौम्याने 'चक्रवर्ती अशोक सम्राट','दिल की नजर से खूबसूरत' या मालिकांमध्येही काम केलं. एमटीव्ही वेबशो मध्येही ती दिसली.

आपल्या करिअरच्या शिखरावर असताना सौम्याने लग्न केलं. २०१७ साली अमेरिकेत राहत असलेल्या अभिनेता अरुण कपूरसोबत ती विवाहबद्ध झाली. नंतर ती करिअर सोडून अमेरिकेत स्थायिक झाली.

तिला एक मुलगाही झाला. मात्र प्रेग्नंसीवेळीच सौम्याने कौटुंबिक हिंसाचाराचा सामना केला. तिला आत्महत्येचेही विचार यायचे पण लेकासाठी ती त्यातून सावरली.

अरुणपासून संरक्षण मिळावं म्हणून सौम्या अमेरिकेच्या 'सेफहाऊस' मध्येही राहिली. तिथे हिंसा आणि छळ सहन करणाऱ्या महिलांना आश्रय दिला जातो. यानंतर २०१९ साली सौम्याने अरुणपासून घटस्फोट घेतला.

काही वर्षांनी सौम्याला दुसरं प्रेम मिळालं. आर्किटेक्ट शुभम चुहाडियासोबत तिने लग्नही केलं. दोघंही एकमेकांचे चांगले मित्र होते. म्हणूनच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

सौम्या आता शुभम आणि लेकासोबत अमेरिकेतील वर्जिनिया येथे सुखी संसार करत आहे. शिवाय ती तिथे रिअल इस्टेटचा व्यवसाय करते. वयाच्या ३३ व्या वर्षी ती लायसंस होल्डर रियल्टर झाली आहे.