अरेच्चा! प्रसिद्ध अभिनेत्रीने फोटोशूट करुन केलेली घटस्फोटाची घोषणा, पतीचा फोटोही फाडलेला, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 14:56 IST2025-09-15T14:13:47+5:302025-09-15T14:56:00+5:30
प्रसिद्ध अभिनेत्रीने फोटोशूट करुन खास घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यामुळे अभिनेत्रीचं कौतुक झालंच शिवाय अनेकांना आश्चर्यही वाटलं

लग्नसमारंभाचे अनेक फोटोशूट पती-पत्नी करत असतात. इतकंच नव्हे आजकाल प्री-वेडींग फोटोशूटही केलं जातं. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने घटस्फोटाचं फोटोशूट केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ही अभिनेत्री आहे शालिनी. टीव्ही अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर असणाऱ्या शालिनीने फोटोशूट करुन घटस्फोटाची घोषणा केली होती. २०२३ मध्ये शालिनीने केलेलं हे फोटोशूट पुन्हा व्हायरल झालंय.
हातात वाईनची बॉटल ठेऊन लाल गाऊनमध्ये शालिनीने हे फोटोशूट केलंय. शालिनीच्या फोटोशूटची चर्चा एका कारणामुळे खास रंगली.
शालिनीचं फोटोशूट व्हायरल होण्यामागे कारण म्हणजे यात तिने तिच्या पतीचा फोटो फाडला होता. ''माझ्या आयुष्यात ९९ समस्या आहेत. पण माझा पती त्यापैकी एकही समस्या नाही'', अशी उपरोधात्मक पोस्ट लिहून शालिनीने तिच्य्या पतीचा फोटो फाडलेला.
अशाप्रकारे शालिनीच्या फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगली. घटस्फोट हे अपयश नसून ती एक नवीन सुरुवात आहे, अशा शब्दात शालिनीच्या या फोटोशूटचं सर्वांनी कौतुक केलं.
एका वाईट लग्नाला सोडणंच चांगलं असतं. कारण तुम्हालाही आनंदी राहण्याचा अधिकार आहे, असं कॅप्शन शालिनीने या फोटोखाली लिहिलं होतं.
शालिनीने जुलै २०२० मध्ये रियाजसोबत लग्न केलं होतं. पण लग्नानंतर तीनच वर्षांनी अर्थात २०२३ मध्ये तिने पतीसोबत घटस्फोट घेऊन हे फोटोशूट केलं