मराठी सिनेइंडस्ट्रीला रामराम करत ही प्रसिद्ध अभिनेत्री परदेशात झाली स्थायिक, लूकमध्येही झालाय बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 07:00 AM2022-11-06T07:00:00+5:302022-11-06T07:00:00+5:30

सिनेइंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी काही कालावधी अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर परदेशात स्थायिक झाल्या आहेत.

सिनेइंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी काही कालावधी अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर परदेशात स्थायिक झाल्या आहेत. असेच काही माधुरी दीक्षितनेही केले होते. लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. मात्र बऱ्याच वर्षांनंतर ती भारतात परतली आणि सध्या ती बॉलिवूडमध्ये सक्रीयदेखील आहे.

अभिनेत्री मृणाल दुसानिस मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. पण सध्या ती सिनेइंडस्ट्रीपासून दुरावली आहे.

मृणाल दुसानीस ही मूळची नाशिकची रहिवासी आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक मालिका केलेल्या आहेत.

मृणाल ‘तू तिथे मी’ या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेमध्ये चिन्मय मांडलेकर हा देखील दिसला होता.

त्यानंतर मृणालने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतही काम केले. अस्सं सासर सुरेख बाई तसेच मन हे बावरे या मालिकेतही ती झळकली आहे.

मृणाल दुसानीसने २५ फेब्रुवारी २०१६ रोजी नीरज मोरेसोबत लग्न केले आहे. नीरज मोरे हा अमेरिकेमध्ये स्थायिक आहे.

अमेरिकेमध्ये नीरज मोरे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मृणाल देखील त्याच्यासोबतच तिथे राहते आहे.

मृणाल दुसानिस आणि नीरज मोरेला एक मुलगी असून त्यांचा फॅमिली फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात.

मृणाल दुसानिसचा लूकही खूप बदलला आहे.

अमेरिकेत स्थायिक झालेली मृणाल भारतात कधी परतणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.