होणारा नवरा कोणासारखा दिसायला हवा? जुई गडकरीने दाखवला थेट 'या' अभिनेत्याचा फोटो

By देवेंद्र जाधव | Updated: June 24, 2025 12:58 IST2025-06-24T12:44:26+5:302025-06-24T12:58:07+5:30

होणारा नवरा कसा असावा, कोणासारखा दिसावा? असा प्रश्न विचारताच ठरलं तर मगमधील सायली अर्थात जुई गडकरीने एका प्रसिद्ध अभिनेत्याचा फोटो सर्वांना दाखवला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

जुई सध्या ठरलं तर मग मालिकेत सायलीची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील सायली - अर्जुनच्या जोडीला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळतंय.

जुई गडकरी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. पुढचं पाऊल या मालिकेतून जुईला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली

जुई गडकरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे फॅन अभिनेत्रीला विविध प्रश्न विचारत असतात. जुई सुद्धा सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरं देत असते.

जुई गडकरी रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. एका चाहत्याने जुईला सोशल मीडियावर विचारलं की, तिला होणारा नवरा कसा हवाय? त्यावर जुईने थेट अभिनेत्याचा फोटोच दाखवला

होणारा नवरा कोणासारखा दिसायला हवा, त्याचा फोटो, असा प्रश्न चाहत्याने विचारताच जुईने साउथ सुपरस्टार सूर्याचा फोटो दाखवला. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं

हा फोटो शेअर करुन जुई म्हणाली, होणारा नवरा सूर्यासारखा असायला हवा. तो एक अभिनेता आहे म्हणून नव्हे तर तो एक फॅमिली मॅन आहे, अशा शब्दात जुईने भावना व्यक्त केल्या.

जुईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती सध्या ठरलं तर मग मालिकेत अभिनय करत आहे. या मालिकेत जुई साकारत असलेल्या सायलीच्या भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळतंय