साध्याभोळ्या 'जेठालाल'चं शिक्षण किती? एका एपिसोडसाठी दिलीप जोशी घेतात 'इतके' लाख! संपत्तीचा आकडा एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 07:08 PM2024-05-26T19:08:05+5:302024-05-26T19:10:01+5:30

Dilip Joshi: किती शिकले आहेत 'जेठालाल'? एका एपिसोडसाठी घेतात इतके लाख, संपत्तीचा आकडा ऐकून झोप उडेल

'तारक मेहता का उलटा चष्मा'मधील जेठालाल प्रत्येकाच्या घराघरात पोहोचला आहे. या जेठालालच्या भूमिकेने अभिनेता दिलीप जोशींनाही प्रसिद्धी मिळवून दिली. आज दिलीप जोशींचा ५६वा वाढदिवस आहे.

दिलीप जोशी यांनी BCA पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. कॉलेज जीवनात असताना त्यांना इंडियन नॅशनल थिएटरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

त्यांनी सलमान खानच्या 'मैंने प्यार किया सिनेमातून अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केली होती. या सिनेमात त्यांनी सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती.

पण, अभिनयातील करिअरमध्ये यश मिळत नसल्याने त्यांनी ट्रॅव्हल एजन्सीही सुरू केली होती. १९८५ ते १९९० या काळात ते ट्रॅव्हल एजन्सीसाठी काम करत होते.

त्यानंतर २००८ साली 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून त्यांनी पुन्हा अभिनयात कमबॅक केलं.

अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेल्या दिलीप जोशींना तारक मेहताने लोकप्रियता मिळवून दिली. गेल्या १६ वर्षांपासून ते या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

तारक मेहता मालिकेत जेठालालची भूमिका साकारण्यासाठी दिलीप जोशी लाखोंमध्ये मानधन घेतात. या मालिकेच्या एका एपिसोडसाठी त्यांना १.५ लाख रुपये मानधन मिळतं.

दिलीप जोशी एकूण ४७ कोटींचे मालक आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये तब्बल १३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पाच वर्षांपूर्वी त्यांच्या नावावर २० कोटींची प्रॉपर्टी होती. तर मीडिया रिपोर्टनुसार, २०२३ मध्ये त्यांच्या प्रॉपर्टीत ४७ कोटींपर्यंत वाढ झाली आहे.