who is Shafaq Naaz: घरातून पळून गेली होती शिजान खानची बहीण शफक नाज, आईवर केले होते गंभीर आरोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 14:37 IST2022-12-28T13:33:28+5:302022-12-28T14:37:37+5:30
तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणावर शिजानच्या कुटुंबीयांकडून पहिली प्रतिक्रिया देणारी त्याची बहीण शफक नाज होती. जिने तिच्या कुटुंबावर याआधी गंभीर आरोप केले होते.

Sheezan Khan Sister Shafaq Naaz: तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिजान खानची बहीण शफक नाजनं आपल्या आईवर गंभीर आरोप लावले होते. (फोटो इन्स्टाग्राम)
टीव्ही अभिनेता शिजान खान आणि त्याचं कुटुंबीय तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलं आहे. शिजानचे कुटुंब वादामुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. (फोटो इन्स्टाग्राम)
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणापूर्वी शिजानची बहीण शफाक नाज (Shafaq Naaz) हिने कुटुंबावर केलेले आरोप खूप चर्चेत आले होते. (फोटो इन्स्टाग्राम)
शफकानं आईवर तिचं पैसे हिसकावल्याचा आरोप केला होता. यानंतर तिची बहीण फलक नाजनं खुलासा करत शफकसोबतचं सर्व संबंध तोडल्याचं सांगितलं होतं. (फोटो इन्स्टाग्राम)
टेलिचक्करच्या रिपोर्टनुसार, फलकने म्हटले होते की, शफाक आता नाज कुटुंबाचा भाग नाही. 2018 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत फलक म्हणाली होती, “दोन वर्षांपूर्वी (2016) ती आमच्यापासून दूर गेली होती. तिनं माझ्या आईवर पैसे हिसकावल्याचा आरोप केला. भांडणानंतर ती घरातून निघून गेली आणि त्यानंतर आमच्याशी तिचं कधीच बोलणं झालं नाही.” (फोटो इन्स्टाग्राम)
शिजान, फलक आणि शफाक यांच्या आईने त्यांना सिंगल मदर म्हणून वाढवले आहे. शफाकच्या आरोपांमुळे त्यांची आई कोलमडून गेली असल्याचं फलकने सांगितले. फालकने सांगितले की, तिला शफाकसोबत कोणतंही नातं ठेवायचे नाहीत. (फोटो इन्स्टाग्राम)
शफाकला कुटुंबाचे पालनपोषण करताना त्रास होत असल्याचा आरोप फलकने केला होता. तिला लग्झरीस लाईफ जगायची होती. घरातून बाहेर पडल्यानंतर शफाक नाजने कधीही घराच्यांशी संपर्क साधला नाही. (फोटो इन्स्टाग्राम)
अनेक वर्षांनंतर, शिजानच्या प्रकरणानंतर, शफाक तिच्या कुटुंबाकडे परत आल्याचे दिसते. नुकतेच तिनं कुटुंबाच्या वतीने प्रतिक्रिया देत कृपया आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेची काळजी घ्या असं म्हटलं होतं. (फोटो इन्स्टाग्राम)
शफाक नाज ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिनं 'महाभारत', 'चिड़ियाघर' आणि 'गम है किसी के प्यार में' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 'ससुराल सिमर का' मधून तिला लोकप्रियता मिळाली. (फोटो इन्स्टाग्राम)