प्रथमेशने मुग्धाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट, म्हणाला - "तुम जियो हजारो साल..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 03:02 PM2024-04-06T15:02:00+5:302024-04-06T15:06:22+5:30

Prathamesh Laghate And Mugdha Vaishampayan : प्रथमेश लघाटेने नुकतेच मुग्धा वैशंपायनच्या बर्थडे निमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी संगीत विश्वातली गाजलेली जोडी म्हणजे प्रथमेश लघाटे (prathamesh laghate ) आणि मुग्धा वैशंपायन (mugdha vaishampayan).

लग्न झाल्यापासून ही जोडी कायम चर्चेत असतात. ते दोघे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. दरम्यान प्रथमेश लघाटेने नुकतेच मुग्धा वैशंपायनच्या बर्थडे निमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

मुग्धा सोबतचे फोटो शेअर करत प्रथमेशने लिहिले की, Wish you a very happyyy birthdayyy My Forever..Tum Jiyo Hazaro Saal…

प्रथमेशच्या या पोस्टवर चाहते मुग्धाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. .

दरम्यान, मुग्धा आणि प्रथमेश ही जोडी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे हे दोघेही मराठी कलाविश्वात सक्रीय आहे. तसंच मुग्धाचं युट्यूब चॅनेल सुद्धा आहे जेथे ती प्रथमेशसोबतच्या गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असते.

दरम्यान, मुग्धा आणि प्रथमेश ही जोडी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून लोकप्रिय झाली.

मुग्धा अलिबागची असून प्रथमेश रत्नागिरीचा आहे. दोघंही उत्तम गायक तर आहेतच पण खूप सरळ आहेत.

कुठलाही बडेजाव न दाखवता आपलं साधं, सुंदर आयुष्य चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांचा हा स्वभाव चाहत्यांच्याही खूप पसंतीस पडतो.

विशेष म्हणजे हे दोघेही मराठी कलाविश्वात सक्रीय आहे. तसंच मुग्धाचं युट्यूब चॅनेल सुद्धा आहे जेथे ती प्रथमेशसोबतच्या गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असते.