Prajakta Mali : प्राजक्ता म्हणते, "मी शाकाहारी!" अभिनेत्रीने नॉनव्हेज का सोडलं? कारण ऐकून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:28 IST2025-08-08T10:39:02+5:302025-08-08T11:28:51+5:30
Prajakta Mali Birthday : तुम्हाला माहितीये का प्राजक्ता व्हेजिटेरियन आहे आणि ती नॉनव्हेज खात नाही.

प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री. प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या लाडक्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे.
प्राजक्ता तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांना फिदा करते. पण, तुम्हाला माहितीये का प्राजक्ता व्हेजिटेरियन आहे आणि ती नॉनव्हेज खात नाही.
प्राजक्ता मांसाहाराला स्पर्शही करत नाही. यामागचं कारणही प्राजक्ताने मुलाखतीत सांगितलं होतं.
"नॉनव्हेज पचवण्यासाठी आपल्या शरीराला ७२ तास लागतात. प्राण्यांची पचन संस्था वेगळी असते आणि माणसांची वेगळी असते".
"त्यामुळे मला वाटतं नॉनव्हेज हे माणसांसाठी बनलेलं नाही", असं प्राजक्ता म्हणाली होती.
"मी आधी नॉनव्हेज खायचे, मग त्यानंतर सोडलं", असा खुलासा प्राजक्ताने केला होता.
हळूहळू व्हिगन होण्याकडे कल असल्याचंही प्राजक्ता बोलली होती. याशिवाय आपल्या मातीत जे पदार्थ पिकतात तेच आपण खाल्ले पाहिजेत असा सल्ला प्राजक्ताने दिला होता.