No makeup look! मेकअप नसतानाही दिपिका अन् प्रियांकाच्या तोडीस तोड ठरला पायल रोहतगीचा वेडिंग लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 02:48 PM2022-07-10T14:48:12+5:302022-07-10T14:51:44+5:30

Payal sangram wedding photos : पायल रोहतगीच्या लग्नाचे फोटो आले समोर; पाहा अभिनेत्रींचा वेडिंग अल्बम

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी हिने नुकतीच (९ जुलै) प्रियकर आणि अभिनेता संग्राम सिंह याच्यासोबत लग्नगाठ बांधली.

वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत येणारी पायल गेल्या कित्येक वर्षांपासून संग्रामला डेट करत होती.

लॉकअपमध्ये असताना पायलने संग्रामसोबतच्या लग्नाविषयी भाष्य केलं होतं. १२ वर्ष एकमेकांना डेट केलेल्या या जोडीने आग्रामध्ये लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर पायलने या सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा नो मेकअप लूक चर्चेचा विषय ठरत आहे.

पायलने लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केल्यानंतर ते सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये पायलने लाल रंगाचा भरजरी लेहंगा परिधान केला आहे. परंतु, यावेळी तिने कोणताही मेकअप केलेला नाही.

लग्नामध्ये पायलने लाल रंगाचा लेहंगा आणि त्यावर दागदागिने परिधान केले होते. तर, संग्रामने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.

आग्रामधील जेपी हॉटेलमध्ये पायल-संग्रामने मोजक्या पाहुण्यांच्या आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर पायल-संग्राम मुंबई आणि दिल्लीमध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत.