अरबाजच्या एक्स गर्लफ्रेंडनं १० महिन्यांनी केली पहिली पोस्ट, अरबाजला अजून विसरू शकली नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:38 IST2025-07-17T15:27:12+5:302025-07-17T15:38:46+5:30

निक्कीसाठी अरबाजनं सोडलेली एक्स परतली सोशल मीडियावर, पहिली पोस्ट पाहून नेटकरी थक्क!

'बिग बॉस मराठी ५'मध्ये अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांचं नातं (Nikki Tamboli Arbaaz) अनेकांच्या चर्चेचा विषय ठरलं होतं.

शोमध्ये येण्यापूर्वी कमिटेड असलेला अरबाज हा बिग बॉसच्या घरात निक्कीच्या प्रेमात पडला आणि त्याने त्याची गर्लफ्रेंड लीझा बिंद्राशी नातं तोडलं.

यानंतर लीझा पूर्णपणे सोशल मीडियावरून गायब झाली होती. मात्र, आता तब्बल १० महिन्यांनी लीझा बिंद्रा पुन्हा सोशल मीडियावर ( Liza Bindra Instagram Comeback)परतली आहे.

तिची पहिली पोस्ट, त्यातलं कॅप्शन आणि फॉलो केलेलं 'ते' एकमेव अकाउंट पाहून चाहत्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं जात आहे.

लीझाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक सुंदर फोटो पोस्ट (Leeza Bindra First Instagram Post After Breakup with Arbaaz Patel) केला आहे. त्यात कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "मी फक्त माझं आयुष्य जगत आहे. जेव्हा तुम्ही शांत असता, तेव्हा आयुष्य आणखी शांततापूर्ण होतं".

याशिवाय लीझाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची आई रडताना दिसतेय. या व्हिडीओसोबत तिने लिहिलंय, "भावनिक क्षण… माझे आई-वडील मी सोशल मीडियावर परतल्याचं पाहून खूप आनंदी आहेत".

लीझा सोशल मीडियावर सक्रिय झाल्यानंतर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलेली गोष्ट म्हणजे, ती सध्या फक्त एकच अकाउंट फॉलो करत आहे. विशेष म्हणजे हे अकाउंट अरबाज पटेलचं नाही, तर लीझा आणि अरबाजचं एकत्र फॅनपेज आहे. या पेजवर या दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो आहेत.

पूर्वी लीझा केवळ अरबाज पटेलला फॉलो करत होती. मात्र नातं तुटल्यानंतर तिने त्याला अनफॉलो केलं होतं. आता फक्त त्यांच्या दोघांच्या फॅनपेजलाच फॉलो केल्यामुळे ती अजूनही अरबाजला विसरली नसल्याचा अंदाज तिच्या चाहत्यांनी बांधला आहे.

लीझा बिंद्राला पुन्हा सोशल मीडियावर परतलेलं पाहून तिचे चाहते प्रचंड आनंदी आहेत. अनेकांनी तिचं सोशल मीडियावर जोरदार स्वागत केलं असून, तिच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडलाय.

लिझा एक मॉडेल व कंटेंट क्रिएटर आहे. तिचे इन्स्टाग्रामवर साडेसात लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे अरबाजचे अनेक रोमँटिक फोटो पाहायला मिळतात.

तर दुसरीकडे अरबाज व निक्की दोघेही 'बिग बॉस' संपल्यापासून एकत्र आहेत. ते रिलेशनशिपमध्ये असून दोघे कायम सोशल मीडियावर रोमँटिक फोटोशूट शेअर करत असतात.