वनिताचा बोल्ड लूक; दमदार पर्सनालिटीमुळे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 16:20 IST2023-12-10T16:11:05+5:302023-12-10T16:20:03+5:30
Vanita kharat: वनिताच्या या फोटोंना प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळे तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वनिता खरात हे नाव आता कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन राहिलेलं नाही.
उत्तम अभिनयकौशल्य आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती कायम प्रेक्षकांना खिळवून ठेवत असते.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून वनिता प्रत्येक प्रेक्षकाच्या घराघरात पोहोचली आहे. त्यामुळे ती नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चेत असते.
वनिताने मराठीसह बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. कबीर सिंग या गाजलेल्या सिनेमात ती झळकली आहे.
वनिता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्याशी निगडीत कायम नवनवीन पोस्ट ती शेअर करत असते.
अलिकडेच वनिताने एक खास फोटोशूट केलं आहे. यातील काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये वनिताने ब्लॅक रंगाचा वनपीस ड्रेस परिधान केला आहे. त्याच्यावर तिने मल्टीकलर असलेलं ट्रेंडी जॅकेट घातलं आहे.
वनिताच्या या फोटोंना प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळे तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.