मुंबई किंवा पुण्याची नाहीये अरुंधती; उत्तर महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी गेलंय मधुराणीचं बालपण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 03:58 PM2023-08-25T15:58:02+5:302023-08-25T16:02:36+5:30

Madhurani gokhale: सध्या मधुराणी पुण्यात राहत असून ती मालिकेच्या शुटिंगसाठी वरचेवर मुंबई-पुणे प्रवास करत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर. आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून मधुराणीने तुफान लोकप्रियता मिळवली आहे.

आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचा पाहायला मिळतो.

अरुंधती उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक कवयित्रीदेखील आहे.

मराठीतली गुणी अभिनेत्री म्हणून मधुराणीकडे पाहिलं जातं. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

सध्या मधुराणी पुण्यात राहत असून ती मालिकेच्या शुटिंगसाठी वरचेवर मुंबई-पुणे प्रवास करत असते.

अनेकांना असं वाटतं की मधुराणी पुण्याची आहे. परंतु, मधुराणी मूळची पुण्याची नसून तिचं बालपण उत्तर महाराष्ट्रात गेलं आहे.

मधुराणी मूळची भुसावळची आहे. इथेच तिची जडणघडण झाली.

बराच काळ भुसावळमध्ये घालवल्यानंतर ती पुण्यात स्थायिक झाली.