बाथटबमध्ये बसून मराठमोळ्या अभिनेत्रीचं क्लासी फोटोशूट; bigg boss मुळे आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 06:57 PM2024-02-20T18:57:33+5:302024-02-20T19:02:04+5:30

Amruta dhongade: अमृताने काळ्या रंगाच्या डिझायनर वनपीस शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता धोंगडे.

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या अमृताला बिग बॉसमुळे खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या शो मुळे अमृता प्रकाशझोतात आली.

सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाल्याचं दिसून येतं. अमृताही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करत असते.

ती बऱ्याचदा तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफमधील गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करते.

यात अलिकडेच तिने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. अमृताने बाथटबमध्ये बसून फोटोशूट केलं आहे.

अमृताने काळ्या रंगाच्या डिझायनर वनपीस शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

अमृता कायम लाइमलाइटमध्ये रहात असते. त्यामुळे ती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरते.

अमृता कायम तिचे बोल्ड आणि हटके फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.