फिटनेस फ्रिक ऐश्वर्या नारकरांचा मनमोहक अंदाज; शेअर केले साडीतील सुरेख फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 17:15 IST2024-05-29T17:15:00+5:302024-05-29T17:15:00+5:30

Aishwarya narkar: ऐश्वर्या यांच्याकडे पाहिल्यानंतर वय म्हणजे फक्त आकडा असल्याचं लक्षात येतं.

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.

उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर ऐश्वर्या यांनी आजवर इंडस्ट्रीत त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

सध्या त्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करत आहेत.

सोशल मीडियावर त्यांचा दांडगा वावर आहे. त्यामुळे कायम नवनवीन पोस्ट त्या शेअर करत असतात.

सोशल मीडियावर कोणताही नवा ट्रेंड आला की त्या सहज फॉलो करतात. त्यांच्या या व्हिडीओंना नेटकरी विशेष पसंती देतात.

अलिकडेच त्यांनी एक फोटोशूट केलं आहे. त्यांचे हे फोटो सध्या चाहत्यांमध्ये चर्चिले जात आहेत.

ऐश्वर्या यांच्याकडे पाहिल्यानंतर वय म्हणजे फक्त आकडा असल्याचं लक्षात येतं.