" हास्यजत्रेमुळे अनेक सिनेमे हातातून गेले", प्राजक्ताचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "सई, सोनाली किंवा हृतासारखं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 05:04 PM2024-01-03T17:04:41+5:302024-01-03T17:22:29+5:30

आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांत तिने काम केलं आहे. पण, तिचा एकही चित्रपट सुपरहिट ठरला नाही. याबाबत तिने खंत व्यक्त केली आहे.

प्राजक्ता माळी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांत तिने काम केलं आहे. पण, तिचा एकही चित्रपट सुपरहिट ठरला नाही.

प्राजक्ताने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खंत व्यक्त केली. ती म्हणाली, " मला पहिला चित्रपट पटकन मिळाला. त्यानंतर केदार शिंदेंची खो खो केला."

"पण, सई ताम्हणकर, सोनाली, हृता यांच्या नावावर टायटल गेल्या असलेले चित्रपट आहेत. पण, माझ्यावर नावावर असा चित्रपट नाही. किंवा माझ्या नावावर 'सैराट', 'दुनियादारी'सारखा सुपरहिट सिनेमा नाही."

"मला टेलिव्हिजन मध्ये स्ट्रगल करावा लागला नाही. माझे सगळ्या मालिका आणि शो हिट गेले. पण, चित्रपट हिट करण्यात स्ट्रगल करावा लागत आहे."

"मी खूप वेळ टेलिव्हिजनचा चेहरा बनून राहिले. त्यामुळे कमर्शियल फिल्म वाट्याला आल्या नाहीत. माझे आधीचे चित्रपट न चालल्यामुळे दुसऱ्या चित्रपटांत वर्णी लागली नाही."

"हास्यजत्रेमुळे मी वेळ नाही देऊ शकणार, असं काहींना वाटलं. त्यामुळेही हातातून सिनेमे गेले. हास्यजत्रेत आम्ही फार काळ शूटिंग करत नाही."

"पण, त्याचं एक्पोजरच इतकं आहे की आम्ही खूप व्यग्र असल्याचं वाटतं. त्यामुळे हास्यजत्रेमुळे काही सिनेमे गेले आहेत. लंडनच्या अनेक फिल्म्स गेल्या. त्यांना वाटलं मी येऊच शकणार नाही, वेळ देऊ शकणार नाही."

"पण, मला असं वाटतं की देवाने आत्तापर्यंत हे घडवलेलं नाही. यामागेही काहीतरी कारण आहे. कदाचित मी काहीतरी वेगळं करावं असं त्याला वाटत असावं," असंही प्राजक्ताने सांगितलं.

प्राजक्ताने 'खो-खो', 'पावनखिंड', 'तांदळा', 'चंद्रमुखी', 'पांडू' अशा अनेक सिनेमांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.