'लेक माझी दुर्गा' मालिकेतील दुर्गाचा पती आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता, जाणून घ्या त्याच्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 06:00 AM2022-07-28T06:00:00+5:302022-07-28T10:57:53+5:30

अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक जोडी आहे 'लेक माझी दुर्गा'मध्ये दुर्गाची भूमिका साकरणारी रश्मी अनपट आणि तिच्या पतीची.

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात.

अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक जोडी आहे लेक माझी दुर्गामध्ये दुर्गाची भूमिका साकरणारी रश्मी अनपट आणि तिच्या पतीची. (Photo Instagram)

रश्मीने तिच्या करिअरची सुरुवात नाटकापासून केली. स्वभावाला औषध नाही. गाठीभेटी या नाटकांमध्ये तिने काम केले. यानंतर ती सुवासिनी मालिकेत झळकली होती.(Photo Instagram)

'पुढचं पाऊल,' ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘फ्रेशर्स’, ‘कुलस्वामिनी’ या मालिकांमध्ये रश्मीने काम केले. कुलस्वामिनी' या मालिकेमुळे रश्मीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.(Photo Instagram)

रश्मीचा पती अमित खेडेकर हा देखील अभिनेता आहे.(Photo Instagram)

अमितने हृदयांतर, हिरकणी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. (Photo Instagram)

रश्मी आणि अमित नेहमीच एकमेंकासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.(Photo Instagram)

फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री दिसून येते. सोशल मीडियावर दोघांचा मोठा चाहता वर्ग आहे. (Photo Instagram)