कॉकटेल पार्टीसाठी अंकिता वालावलकरचा ग्लॅमरस लूक, झक्कास फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 11:25 IST2025-02-16T11:11:45+5:302025-02-16T11:25:45+5:30

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Photos: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरच्या घरी सध्या लग्नाची चांगलीच गडबड सुरु आहे. आज १६ फेब्रुवारी अंकिता वालावलकर कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

काल अंकिताच्या घरी लग्नाआधी कॉकटेल पार्टी झाली. यासोबतच अंकिताचा वाढदिवस सुद्धा साजरा करत डबल सेलिब्रेशन झालं.

कॉकटेल पार्टीसाठी अंकिता आणि तिचा होणारा नवरा कुणाल यांनी सुंदर लूक केला होता.

अंकितानं आपल्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे पार्टीचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अंकितानं लाल रंगाचा वन पीस परिधान केला होता. ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत होती. अंकिताच्या या लूकने तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तर कुणाल पांढरा शर्ट त्यावर काळ्या रंगाचा ब्लेझर या लूकमध्ये दिसला. दोघांनी एकत्र डान्सही केला.

अंकिता आणि कुणाल गेली काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. झी मराठीच्या एका कार्यक्रमात त्यांची ओळख झाली.

आता ते साताजन्माची गाठ बांधण्यासाठी सज्ज आहेत. अंकिताची मित्रमंडळी, दोघांचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडणार आहे.

अंकिताच्या लग्नाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून, कोकणी पद्धतीने हा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे.

चाहते त्यांना त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.