खतरों के खिलाडी: शो सुरु होण्यापूर्वीच 'बिग बॉस'फेम स्पर्धक बाहेर?; चाहत्यांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 02:17 PM2023-05-31T14:17:37+5:302023-05-31T14:21:21+5:30

khatron ke khiladi 13: शो सुरु होण्यापूर्वीच एलिमिनेशनच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

सध्या छोट्या पडद्यावर रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी या कार्यक्रमाची प्रचंड चर्चा रंगली आहे. लवकरच या शोचा १३ वा सीजन सुरु होणार आहे.

या शोचं साऊथ अफ्रिकेत शुटींग सुरु झालं असून लवकरच हा शो टीव्हीवर प्रसारित होणार आहे.

या शोमध्ये बिग बॉस १६ चे शिव ठाकरे आणि अर्चना गौतम हे दोन स्पर्धक सहभागी झाले आहेत. याच्याविषयी सध्या एक मोठी माहिती समोर येत आहे.

खतरों के खिलाडीच्या सेटवरुन दररोज नवनवीन माहिती समोर येत असते. यात हा शो सुरु होण्यापूर्वीच एलिमिनेशनच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, खतरों के खिलाडीमध्ये सहभागी झालेल्या एका बिग बॉस स्पर्धकाला बाहेर पडावं लागलं आहे.

त्यामुळे हा स्पर्धक नेमका कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

खतरों के खिलाडीमधून अर्चना गौतम ही चौथ्याच आठवड्यात एलिमिनेट झाली आहे.

सध्या सोशल मीडियावर अर्चनाची चर्चा सुरु असली तरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.