गुरमीत चौधरी व देबिना बॅनर्जीचं तिसरं लग्न, पाहा पारंपरिक लग्नाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 06:02 PM2021-10-04T18:02:36+5:302021-10-04T18:11:23+5:30

आधी पळून जात लग्न केलं, मग कोर्ट मॅरेज केलं; आता बंगाली पद्धतीनं बांधली लग्नगाठ

छोट्या पडद्यावरचे ‘राम-सीता’ अर्थात गुरमीत चौधरी व देबिना बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. होय, बंगाली रितीरिवाजाने केलेल्या या लग्नाचे फोटोही दोघांनी शेअर केले आहेत.

बंगाली वधुच्या पोशाखात देबिना प्रचंड सुंदर दिसतेय. गुरमीतही नवरदेवच्या वेषात राजबिंडा दिसतोय. दोघांचं हे तिसरं लग्न आहे.

फायनली..., असं लिहित दोघांनीही लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. सध्या या फोटोंची जोरदार चर्चा आहे.

2006 मध्ये देबिना व गुरमीत यांनी घरून पळून जाऊन लग्न केलं होतं. गुरमीतने या लग्नाचे काही फोटो शेअर केले होते.

यानंतर 2011 साली गुरमीत व देबिना यांनी पुन्हा लग्न केलं. कुटुंबीयांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीनं हे लग्न पार पडलं होतं.

आता देबिना व गुरमीत यांनी बंगाली पद्धतीने तिस-यांदा लग्नगाठ बांधली आहे. किमान फोटो पाहून तरी हाच अंदाज बांधला जातोय.

2005 मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस बॉलिवूड या टॅलेंट हंट शोदरम्यान देबिना व गुरमीत यांची पहिली भेट झाली होती.

यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दुस-या वर्षी दोघांनी पळून जाऊन लग्नही उरकलं होतं. रामायण या टीव्ही मालिकेत देबिना व गुरमीत यांनी राम-सीतेची भूमिका साकारली होती. नच बलिएच्या 6 व्या सीझनमध्येही हे कपल दिसलं होतं.

Read in English