'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये मानधन घ्यायचा निलेश साबळे, आकडा वाचून झोप उडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:28 IST2025-07-03T14:25:53+5:302025-07-03T15:28:50+5:30
'चला हवा येऊ द्या'मधून निलेश साबळेचा पत्ता कट झाला आहे. पण, सुरुवातीच्या सीझनला निलेश साबळे किती मानधन घ्यायचा हे तुम्हाला माहितीये का?

'चला हवा येऊ द्या' हा मराठी टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो. १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करून निरोप घेतलेला हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'चला हवा येऊ द्या' शोचं सूत्रसंचालन करून निलेश साबळेने प्रसिद्धी मिळवली होती. पण, आता नव्या सीझनमध्ये मात्र निलेश साबळे दिसणार नाहीये.
निलेश साबळेच्या जागी आता 'चला हवा येऊ द्या'चं सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर करताना दिसणार आहे.
'चला हवा येऊ द्या'मधून निलेश साबळेचा पत्ता कट झाला आहे. पण, सुरुवातीच्या सीझनला निलेश साबळे किती मानधन घ्यायचा हे तुम्हाला माहितीये का?
हसताय ना.. हसायलाच पाहिजे... या पहिल्याच वाक्यानं सगळ्यांचं जिंकणारा महाराष्ट्राचा लाडका सूत्रसंचालक, कॉमेडियन, लेखक, दिग्दर्शक म्हणजे डॉ. निलेश साबळे.
पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर असणाऱ्या निलेश साबळेने २०१० साली मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमाचा विजेता होता.
ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केल्यानंतर 'चला हवा येऊ द्या'ची धुरा त्याने सांभाळली.
मीडिया रिपोर्टनुसार, 'चला हवा येऊ द्या' या शोचं सूत्रसंचालन करण्यासाठी निलेश साबळे एक ते दीड लाख रुपये इतकं मानधन घ्यायचा.
'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर 'हसताय ना हसायलाच पाहिजे' हा नवा शो निलेश साबळेने सुरू केला होता.