कलाक्षेत्राशी निगडीत आहे कुशल बद्रिकेची पत्नी; लाइमलाइटपासून राहते दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 11:54 AM2023-04-28T11:54:46+5:302023-04-28T12:08:15+5:30

Kushal bedrike:सध्या सोशल मीडियावर कुशलच्या पत्नीची चर्चा रंगली आहे.

उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं करणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके.

चला हवा येऊ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल घराघरात पोहोचला.

कुशलने रिअॅलिटी शोसोबतच काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याची कायम चर्चा रंगत असते.

सध्या सोशल मीडियावर कुशलच्या पत्नीची चर्चा रंगली आहे.

कुशलची पत्नीदेखील कलाक्षेत्राशी निगडीत आहे.

कुशलच्या बायकोचं नाव सुनयना असं असून ती एक कथ्थक नृत्यांगना आहे.

सुनयनाने कथ्थकमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. तिने विशारद आणि अलंकार या पदव्या संपादन केल्या आहेत.

सुनयना स्कूल ऑफ कथ्थक ही नृत्यसंस्था चालवते.

सुनयना अनेक कार्यक्रमात तिचं नृत्याचं सादरीकरण करते.

कुशल चला हवा येऊ द्या कार्यक्रमात अनेकदा बायकोच्या डान्स क्लासचं प्रमोशन करताना दिसतो.