Bigg Boss 15 Winner: कोण आहे 'बिग बॉस 15' विजेती तेजस्वी वायंगणकर, करण कुंद्रा आधी या अभिनेत्याशी जोडले होते नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 01:42 PM2022-01-31T13:42:10+5:302022-01-31T13:42:10+5:30

बिग बॉस 15 च्या विजेत्या(Bigg Boss 15 Winner)चे नाव समोर आले आहे. या रिअ‍ॅलिटी शोची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आहे. बिग बॉस 15 मध्ये, तेजस्वी प्रकाशसह करण कुंद्रा आणि प्रतीक सहजपाल यांनी पहिल्या तीनमध्ये प्रवेश केला. पण तेजस्वीने दोघांचाही पराभव करत सीझन 15 ची ट्रॉफी पटकावली. तेजस्वी आणि प्रतीकने टॉप 2 मध्ये प्रवेश केला. मात्र कमी व्होट्समुळे प्रतीक शोचा फर्स्ट रनर अप ठरला आहे. (Photo Instagram)

तेजस्वी प्रकाश यांचा जन्म 10 जून 1992 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे झाला. तिचे वडील प्रकाश वायंगणकर आणि भाऊ प्रतिक वायंगणकर हे इंजिनिअर आहेत. शालेय शिक्षण पूर्ण करून तीही इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. (Photo Instagram)

तिला लहानपणापासूनच इंजिनिअर व्हायचं होतं. तिने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. पण काही काळानंतर अभिनेत्रीने आपले करिअर बदलण्याचा निर्णय घेतला.(Photo Instagram)

तेजस्वी प्रकाशने अभियांत्रिकीची पदवी घेण्यासोबतच अभिनय विश्वात प्रवेश केला होता. जेव्हा ती टीव्हीवर दिसली तेव्हा ती फक्त 18 वर्षांची होती. तेजस्वीची पहिली मालिका '2612' आहे, जी 2012 मध्ये टेलीकास्ट झाली होती..(Photo Instagram)

यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली, ज्यात 'स्वरागिनी-जोडे रिश्ते का सूर', 'पेहेदार पिया की', 'सिलसिला बदलते रिश्तों का' सारख्या टीव्ही मालिकांचा समावेश आहे.(Photo Instagram)

तेजस्वी प्रकाशचे नाव टीव्हीवरील हँडसम अभिनेता शिवीन नारंगसोबत जोडले गेले होते. दोघेही 'खतरों के खिलाडी'मध्ये दिसले होते. इतकंच नाही तर दोघांची बाँडिंग चाहत्यांना खूप आवडलं होतं. याच कारणामुळे त्यांच्या नात्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, दोघेही नेहमी स्वत:ला एकमेकांचे चांगले मित्र मानतात. (Photo Instagram)

आता तेजस्वी करण कुंद्राला डेट करत आहे. बिग बॉस 15 मध्येच दोघांची जवळीक वाढली होती.(Photo Instagram)