बालिका वधू से 'वधू' तक! अभिनेत्री अविका गौरचा वेडिंग अल्बम समोर, कोण आहे तिचा नवरा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:10 IST2025-10-01T13:03:58+5:302025-10-01T13:10:02+5:30

'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अविकाने नॅशनल टेलिव्हिजनवर 'पती, पत्नी और पंगा' या शोमध्ये मिलिंद चंदवानीसह सात फेरे घेतले.

'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अविकाने नॅशनल टेलिव्हिजनवर 'पती, पत्नी और पंगा' या शोमध्ये मिलिंद चंदवानीसह सात फेरे घेतले.

काही महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता. आता अविका आणि मिलिंद लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

लग्नासाठी अविकाने खास लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. खड्यांची ज्वेलरी घालत नववधू नटली होती.

तर मिलिंद बदामी रंगाच्या शेरवानीमध्ये हँडसम दिसत होता.

लग्नाचे फोटो अविकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. 'बालिका से वधू तक' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

अविका आणि मिलिंदच्या लग्नासाठी टीव्हीवरील अनेक कलाकार सहभागी झाले होते.

अविकाच्या फोटोंवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींना तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

अविकाचा नवरा मिलिंद चंदवानीने आयआयएम अहमदाबादमधून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. नंतर त्याने इन्फोसिसमधून करिअरला सुरुवात केली.

२०१८ मध्ये त्याने कॅम्पस डायरीज या एनजीओची स्थापना केली. एमटीव्ही रोडीज शोमध्येही त्याने सहभाग घेतला होता.

मिलिंद आणि अविकाची भेट त्याच्या एनजीओच्या एका इव्हेंटमध्ये झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले.