१० रुपयांच्या तुरटीतून सुरू केला बिजनेस! अंडरआर्म रोल ऑन विकून अभिनेत्रीने उभी केली कोट्यवधींची कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 15:50 IST2026-05-17T15:32:58+5:302026-05-17T15:50:24+5:30
'बालिका वधू'मधून नेहा मर्दा घराघरात पोहोचली. पण काही वर्षांपासून तिने अभिनयातून ब्रेक घेतला होता. पण आता ती बिजनेसवुमन झाली आहे.

अनेक कलाकार बिजनेसमधूनही कोट्यवधींची कमाई करतात. बालिका वधू फेम अभिनेत्री नेहा मर्दादेखील एक यशस्वी बिजनेसवुमन आहे.

'बालिका वधू'मधून नेहा मर्दा घराघरात पोहोचली. पण काही वर्षांपासून तिने अभिनयातून ब्रेक घेतला होता. पण आता ती बिजनेसवुमन झाली आहे.

नेहा मर्दाने बाजारात मिळणाऱ्या १० रुपयाच्या तुरटीपासून अंडरआर्म रोल ऑन प्रोडक्टचा बिजनेस सुरू केला.

या बिजनेसमध्ये नेहाचा पती आणि भावाने तिला मदत केली.

प्रेग्नंसीमध्ये नेहाला ही बिजनेस आयडिया सुचली होती. तब्बल ३ वर्ष त्यावर काम करून नेहाने तुरटीपासून बनवलेलं ऑर्गनिक रोल ऑन प्रोडक्ट बाजारात आणलं.

शार्क टँक इंडियामध्ये नेहा तिचं Phitku कंपनीचं प्रोडक्ट घेऊन सहभागी झाली होती. मात्र तिथे तिला फार सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

सुरुवातीला नेहाच्या या अंडरआर्म रोल ऑनची किंमत ९९ रुपये इतकी होती. आता तेच प्रोडक्ट ती ९९९ रुपयांना विकते.

१० महिन्यांत नेहाच्या कंपनीने २ लाख ग्राहक जोडले आहेत. प्रत्येक महिन्याला या बिजनेसमधून ती सुमारे २ कोटींची कमाई करते.

१० रुपयांच्या तुरटीपासून सुरू केलेल्या या व्यवसायातून नेहाने २४ कोटींची कंपनी उभारली आहे.

















