"माझं वय ४४, मला दुसरं मुल नकोय!"; प्रसिद्ध अभिनेत्री नवऱ्याला स्पष्टच म्हणाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:58 IST2026-01-23T16:19:06+5:302026-01-23T16:58:14+5:30

टीव्ही इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मला दुसरं मुल नको आहे, हे तिच्या पतीला ठणकावून सांगितलं आहे. कोण आहे ती?

टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या नवऱ्याला स्पष्टच सांगितलं आहे. ''माझं वय ४४ आहे, मला आता दुसरं बाळ नको आहे.''

ही अभिनेत्री आहे किश्वर मर्चंट. किश्वरने वयाच्या ४० व्या वर्षी पहिल्या मुलाला (निरवैर) जन्म दिला होता. आता ४४ वर्षांची असताना किश्वरने तिच्या फॅमिली प्लॅनिंगबद्दल खुलासा केला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किश्वरला दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने स्पष्टपणे सांगितले की, "मला आता वयाच्या ४४ व्या वर्षी दुसरे मूल नको आहे.''

''निरवैरच्या वेळी देखील आम्ही प्लॅनिंग केले नव्हते. माझा नवरा सुयशला मुलगी हवी आहे. त्यामुळे तो माझ्या मागे लागला आहे. परंतु मला आता मूल नकोय, हा माझा निर्णय आता झाला आहे." असा खुलासा किश्वरने केलाय.

किश्वर आणि सुयशच्या वयात ८ वर्षांचे अंतर आहे. जेव्हा त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला, तेव्हा किश्वरच्या अनेक मित्रांनी तिला सावध केले होते.

"माझ्या मित्रांना वाटलं होतं की आमचं नातं टिकणार नाही. ते मला म्हणायचे की सुयश तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे, तो पुढे जाऊन तुला सोडून देईल किंवा तुला फसवेल.'', असा सल्ला मला मित्रांनी दिला होता.

''पण सुयशने सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवले. तो एक खूप चांगला पती आणि पिता आहे."; असा खुलासा किश्वरने केला आहे. किश्वर मर्चंटने 'शक्तिमान', 'कसौटी जिंदगी की' आणि 'प्यार की ये एक कहानी' सारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे.