अरुंधतीच्या ऑनस्क्रीन लेकीच्या सौंदर्याला काही तोड नाही; पूर्वा गोरेचे ग्लॅमरस फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 02:23 PM2024-01-25T14:23:46+5:302024-01-25T14:29:16+5:30

Apurva gore: अपूर्वाने नुकतंच एक फोटोशूट केलं असून या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे.

या मालिकेत अरुंधती, अनिरुद्ध, आप्पा, संजना हे कलाकार जितके लोकप्रिय आहेत. तितकीच या मालिकेतील इशा सुद्धा चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने अरुंधतीच्या लेकीची इशाची भूमिका साकारली आहे.

अपूर्वा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे ती कायम तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अपूर्वाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये अपूर्वाने चेक्सचा शर्ट परिधान केला असून त्यात फोटोसाठी छान पोझ दिल्या आहेत.

अपूर्वाच्या या फोटोंची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण तिच्या फोटोवर कमेंट करत आहेत.