बहिणीच्या लग्नात अभिषेक-कृतिकाचा रोमॅण्टिक अंदाज; पाहुण्यांच्या खिळल्या त्यांच्यावर नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 01:30 PM2023-11-20T13:30:00+5:302023-11-20T13:34:36+5:30

Abhishek deshmukh: अभिषेक आणि कृतिका प्रचंड छान दिसत असून त्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

बिग बॉस मराठीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जावदे.

बिग बॉसमध्ये मैत्रीपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आता लग्नपर्यंत येऊन पोहोचला. नुकतंच या जोडीने थाटात लग्नगाठ बांधली.

अमृता-प्रसादच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अमृताचा भाऊ अर्थात अभिनेता अभिषेक देशमुख आणि त्याची पत्नी कृतिका देव यांचेही काही फोटो व्हायरल झाले आहेत.

बहिणीच्या लग्नात अभिषेकनेही त्याच्या बायकोसोबत चांगलं फोटोशूट करुन घेतलं आहे.

अभिषेक आणि कृतिका प्रचंड छान दिसत असून त्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

कृतिकाने नणंदेच्या लग्नात ऑरेंज कलरची सिल्कची साडी नेसली होती. तर, अभिषेकनेही तिला मॅच होणाऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.

सध्या सोशल मीडियावर अमृता आणि प्रसाद यांच्या लग्नाविषयी प्रत्येक गोष्ट चर्चिली जात आहे.