"आता माझ्याशी लग्न कोण करेल?" अभिनेत्रीने व्यक्त केली चिंता, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अफेअरच्या चर्चा ऐकून वैतागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:08 IST2026-02-27T10:45:32+5:302026-02-27T11:08:07+5:30
एका ३२ वर्षीय अभिनेत्रीचं नाव प्रसिद्ध अभिनेत्यासोबत जोडलं गेलं. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच रंगल्या. पण आता मात्र ही अभिनेत्री लग्न करण्याच्या विचारात आहे.

एका ३२ वर्षीय अभिनेत्रीचं नाव प्रसिद्ध अभिनेत्यासोबत जोडलं गेलं. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच रंगल्या. पण आता मात्र ही अभिनेत्री लग्न करण्याच्या विचारात आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अक्षरा सिंग. भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगचं नाव भोजपुरी स्टार आणि बॉलिवूडमध्येही सक्रीय असलेल्या पवन सिंहसोबत जोडलं गेलं.

सुपरस्टार पवन सिंहसोबतच्या जुन्या वादावर अक्षरा पुन्हा एकदा व्यक्त झाली असून, तिने आपल्या लग्नाबाबत आणि भविष्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

"प्रत्येक वेळी माझं नाव पवन सिंहशी जोडलं गेलं, तर माझ्याशी लग्न कोण करणार?" असा संतप्त सवाल अक्षरा सिंगने विचारला आहे.

"आम्हाला वेगळं होऊन आता खूप काळ लोटला आहे. तरीही लोक मला अजूनही त्याच एका नात्यावरून प्रश्न विचारत असतात.''; असंही अक्षरा म्हणाली.

"जर माझं नाव त्यांच्याशीच जोडलं जात राहिलं आणि त्यांच्यासोबतचे माझे व्हिडिओ व्हायरल होत राहिले, तर माझ्या आयुष्यात येणाऱ्या जोडीदारावर त्याचा काय परिणाम होईल? मलाही सन्मानाने जगण्याचा आणि सुखी संसार करण्याचा अधिकार आहे.", अशी चिंता आणि भावना अक्षराने व्यक्त केल्या.

अक्षरा सिंह आणि पवन सिंह यांचे नाते एकेकाळी भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेले नाते होते. मात्र, त्यांच्या ब्रेकअपचा शेवट अत्यंत कटू झाला होता. अक्षराने पवन सिंहवर शारीरिक छळ, मानसिक दबाव आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप याआधीही केला आहे.

















