सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी शीला दीदी नेमकी आहे तरी कोण? खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 11:17 IST2022-05-03T07:00:00+5:302022-05-03T11:17:03+5:30

Aparna tandale :सोशल मीडियाच्या या शीला दीदीचं खरं नाव अपर्णा तांदळे असं आहे.

सध्या सोशल मीडियावर शीला दीदी या कामवालीची भूमिका करणाऱ्या तरुणीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तिच्या प्रत्येक व्हिडीओवर मिलियन्स व्ह्युज आणि लाखोंच्या संख्येने लाइक्सचा पाऊस पडत आहे. त्यामुळे ही शीला दीदी सध्या सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहे.

आयपीएल तिकीट, पगारवाढ, घरमालकाला आलेला ऑफिसच्या मैत्रिणीचा फोन हे तिचे काही व्हिडीओ तुफान व्हायरल झाले.

ही तरुणी शीला दीदी या कामवालीच्या रुपात अनेक वेगवेगळे मजेदार व्हिडीओ करत असते. त्यामुळे या तरुणीविषयी जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत.

सोशल मीडियाच्या या शीला दीदीचं खरं नाव अपर्णा तांदळे असं आहे.

अपर्णा मुळची पुण्याची असून तिला अभिनयाची विशेष आवड आहे. शाळा, कॉलेजमध्ये असल्यापासून ती नाटकांमध्ये भाग घेते.

अपर्णा सोशल मीडियावर सक्रीय असून ती कॉमेडी व्हिडीओसह काही डान्स व्हिडीओदेखील शेअर करत असते.

अपर्णा सध्या ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. पण तिला अभिनेत्री व्हायचं आहे त्यामुळे तिने त्या दिशेने आतापासूनच पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.

अपर्णा तिच्या आई-वडील आणि दोन बहिणींसोबत राहते.

अपर्णा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.

अपर्णा आणि तिच्या बहिणी