Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 14:43 IST2026-05-07T13:52:12+5:302026-05-07T14:43:30+5:30
थलपति विजयची पत्नी संगीता सोरनालिंगम नक्की कोण आहे? आणि तिची प्रॉपर्टी किती? हे तुम्हाला माहितीये का?

साऊथ स्टार थलपती विजय सध्या त्याच्या पॉलिटिकल करिअरसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत आहे. थलपती विजयचे अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.

तामिळनाडू निवडणुकीआधी थलपति विजय आणि त्याची पत्नी संगीता हिने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यांचा २७ वर्षांचा संसार मोडणार आहे.

पण, थलपति विजयची पत्नी संगीता सोरनालिंगम नक्की कोण आहे? आणि तिची प्रॉपर्टी किती? हे तुम्हाला माहितीये का?

संगीताचा जन्म एका बिजनेस फॅमिलीमध्ये झाला. लंडनमध्ये ती लहानाची मोठी झाली. १९९९ मध्ये थलपती विजयसोबत संगीताने लग्न करत संसार थाटला.

उद्योगपतीच्या घरात वाढलेली संगीता तृषा कृष्णनपेक्षाही श्रीमंत आहे. तिच्या नावावर ४०० कोटींची संपत्ती आहे.

संगीताच्या विविध बँक खात्यावर १० कोटी रुपये आहेत. तिच्याकडे जवळपास ३ किलो सोनं आणि २ कोटी चांदी आहे.

तर तृषा कृष्णन जवळपास ८५ कोटींची मालकीण आहे. तृषापेक्षा संगीताकडे ५ पट जास्त संपत्ती आहे.

















