Ghar Banduk Biryani: 'परश्या'ची नवी हिरोईन पाहिलीत का? रिअल लाईफमध्ये दिसते फारच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 01:07 PM2023-03-10T13:07:49+5:302023-03-10T13:21:03+5:30

Ghar Banduk Biryani, Akash Thosar : सैराटमधील परश्या आणि आर्चीच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ही जोडी तुफान गाजली. आता परश्या अर्थात आकाश ठोसर नव्या हिरोईनसोबत दिसणार आहे. परश्याच्या या नव्या हिरोईनची सध्या जोरदार चर्चा आहे...

सैराटमधील परश्या आणि आर्चीच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ही जोडी तुफान गाजली. आता परश्या अर्थात आकाश ठोसर नव्या हिरोईनसोबत दिसणार आहे.

होय, परश्याच्या या नव्या हिरोईनची सध्या जोरदार चर्चा आहे. नागराज मंजुळेंचा घर, बंदूक, बिरयानी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यात आकाश ठोसर मुख्य भूमिकेत आहे.

या चित्रपटात आकाश ठोसरसोबत दिसणार आहे ती सायली पाटील. परश्याच्या या नव्या हिरोईनने सध्या चाहत्यांना वेड लावलं आहे.

नागराज मंजुळेंच्याच झुंड या सिनेमात सायली पाटील दिसली होती. झुंड चित्रपटातील तिने भावना भाभीची भूमिका साकारली होती.

सायलीनं नागराज यांच्या सैराट या चित्रपटासाठीही ऑडिशन दिलं होतं. पण तेव्हा नागराज यांनी तिच्याऐवजी रिंकू राजगुरूची निवड केली होती.

झुंडच्या वेळी मात्र नागराज यांना हमखास सायलीची आठवण झाली. भावना भाभीची भूमिका ती उत्तम करू शकते, असा विश्वास नागराज यांना होता.

नागराज यांनी झुंडसाठी सायलीला फोन केला, तेव्हा क्षणभर तिचा विश्वासच बसेना. नागराज आपल्याशी बोलताहेत, त्यांनी मला कॉल केला, हे जणू तिला स्वप्न वाटत होतं.

नागराज सरांनी मला फोन केला, तेव्हा मला खरंच वाटत नव्हतं. माझे मित्र माझ्यासोबत प्रॅन्क करत आहेत, असंच क्षणभर मला वाटलं होतं, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

आता हीच सायली नागराज यांच्या घर, बंदुक, बिरयानी या चित्रपटात लीड भूमिकेत झळकणार आहे. सायली सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे.

रिअल लाईफमध्ये सायली प्रचंड ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर ती स्वत:चे एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

आकाश आणि सायलीशिवाय या सिनेमात स्वत: नागराजही अभिनय करताना दिसणार आहे. ते एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत.

सयाजी शिंदे हेही या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ७ एप्रिल २०२३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय.