IN PICS : शिवानी रांगोळे सासूबाईंना ‘आई’ नाही ‘मृणाल ताई’ म्हणते, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 11:13 AM2023-02-08T11:13:46+5:302023-02-08T11:24:36+5:30

Shivani Rangole : शिवानी व तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णी यांच्यात खास बॉन्ड आहे. शिवानी ही सासूबाईची अत्यंत लाडकी आहे.

मराठमोळी अभिनेत्री शिवानी रांगोळे ( Shivani Rangole ) ही आता कुलकर्ण्यांची सून आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस कुलकर्णी व शिवानी यांनी गेल्यावर्षी लग्नगाठ बांधली.

शिवानी व तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णी यांच्यात खास बॉन्ड आहे. शिवानी ही सासूबाईची अत्यंत लाडकी आहे.

होय, दोघीही सासू सूना कमी अन् मैत्रिणी अधिक आहे. म्हणूनच आजही शिवानी सासूबाईंना एकेरी बोलवते. ‘ताई’ अशी हाक मारते.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत शिवानीने यामागचं कारण सांगितलं होतं. एका ताज्या मुलाखतीतही ती यावर बोलली.

विराजसची आई म्हणजे मृणाल कुलकर्णी यांना अगोदरपासूनच आपली होणारी सून कोण आहे? हे माहिती होते. कारण शिवानी आणि विराजस कॉलेजपासून एकत्र होते.

शिवानी व विराजस सतत एकमेकांबरोबर राहत असल्याने लोकांनी आधीच त्यांनी कपल म्हणून हाक मारण्यास सुरुवात केली होती.

विराजस शिवानीला घेऊन कायम घरी यायचा. हा दरवेळी शिवानीलाच घरी का आणतो, असा प्रश्न त्यावेळी मृणाल कुलकर्णींना पडलेला असायचा.

शिवानी व मृणाल यांची त्यामुळे चांगलीच ओळख होती. दोघींनी एकत्र काम केल्यामुळे सेटवर शिवानी मृणाल यांना ताई म्हणायची.

पण विराजसची लग्न झाल्यावर मृणाल शिवानीच्या सासूबाई होणार होत्या. त्यामुळे आता त्यांना काय हाक मारू, असा प्रश्न शिवानीला पडला होता.

अखेर सासूबाईंनीच शिवानीच्या मनातला गुंता सोडवला. तू मला ताईच म्हण, मला आवडेल..., असं मृणाल यांनी आपल्या लाडक्या सूनेला स्पष्टच सांगितलं.

यामुळेच आजही शिवानी मृणाल कुलकर्णी यांना ताई म्हणूनच हाक मारते. हे ऐकल्यावर अनेकांना वेगळ वाटतं, पण सासू सूना मात्र आपल्यातच गुंग असतात.

शिवानी रांगोळे ही लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे.तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत शिवानी काम करतेय.