प्राजक्ताचा टॅटू आहे खूपच खास; 'या' प्रसिद्ध व्यक्तीचं नाव घेतलंय हातावर गोंदून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 05:45 PM2023-11-03T17:45:00+5:302023-11-03T17:45:00+5:30

Prajakta mali: प्राजक्ताने काही खास कारणामुळे हा टॅटू हातावर काढला आहे.

प्राजक्ता माळी हे नाव कोणत्याही व्यक्तीला नवीन नाही. मालिका, सिनेमा असा प्रवास करणारी प्राजक्ता आज घराघरात लोकप्रिय आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून सध्या प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, या कार्यक्रमाव्यतिरिक्त ती अनेक लहानमोठी काम करताना दिसते.

प्राजक्ता यशस्वी अभिनेत्री असण्यासोबतच एक उद्योजिका आणि व्यावसायिकादेखील आहे.

प्राजक्ताचा प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड आहे. तसाच तिचा एक फार्महाऊसदेखील आहे. या दोघांच्या माध्यमातून ती कमाई करते.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताचा आध्यात्मावर प्रचंड विश्वास आहे. तसंच तिच्या कुटुंबावरही तितकंच प्रेम आहे.

सध्या प्राजक्ता तिच्या एका टॅटूमुळे चर्चेत आली आहे. तिने तिच्या हातावर एका खास व्यक्तीचं नाव गोंदवून घेतलं आहे.

प्राजक्ताने तिच्या हातावर आध्यात्मिक गुरु ओशो यांचं नाव गोंदवून घेतलं आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने यामागचं कारणही सांगितलं.

"मी ओशो यांच्याबद्दल खूप वाचन करायचे, त्यांच्या सीडी ऐकायचे. त्यामुळे माझी त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे. मला त्यांचे सगळे विचार पूर्णत: पटायचे.मला सगळ्यांसारखं फूलं, हृदय, चंद्र, चांदणं अशा कॉमन गोष्टींचं टॅटू नको होतं. मला काही तरी वेगळं हवं होतं. मला टॅटू म्हणून अशी गोष्ट हवी होती जी प्रेरणादायक असेल," असं प्राजक्ता म्हणाली.

पुढे ती म्हणते, "तेव्हा मी ओशोंची भक्त झाले होते. त्यांच्या मते धर्म वगैरे असं काही नसतं. मी पण जात, धर्म अशा गोष्टी मानत नाही. त्यामुळे मी ठरवलं की ओशो हे धर्मनिरपेक्ष नाव आपण गोंदवू शकतो आणि मग त्यांच्या नावाचा टॅटू मी काढला."