Wedding Album : मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कुलकर्णी! पाहा, विराजस व शिवानीच्या शाही लग्नाचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 12:34 PM2022-05-06T12:34:19+5:302022-05-06T14:46:15+5:30

Virajas Kulkarni and Shivani Rangole Wedding : विराजस कुलकर्णी नुकताच लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत विराजसने लग्नगाठ बांधली. या शाही लग्नाचे फोटो दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत.

विराजस कुलकर्णी नुकताच लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत विराजसने लग्नगाठ बांधली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हा लग्नसोहळा पार पडला. (all PHOTO- @rangshivani @weddingkraft)

या लग्नाची चर्चा अद्याप सुरू आहे. या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हे फोटो दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत.

शिवानीनं लग्नाचे काही नवे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या शिवानी नववधुच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. लग्नमंडपातील शिवानीचा लुक वेड लावणारा आहे.

लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर विराजस व शिवानी यांनी लग्नमंडपात डान्स केला. दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. सगळेच आनंदात आहेत.

लग्न म्हटल्यानंतर मज्जा येणारच. वरमालेसाठी विराजस व शिवानीला पाहुण्यांनी वर उचलून घेतलं, तो क्षण कॅमेºयात नेमका टिपला गेला आहे.

लग्नानंतर विराजस व शिवानी यांची ही दिलखुलास फ्रेम. निमित्त काय होतं माहित नाही. पण या फोटात नवरा-नवरी खळखळून हसत आहेत.

विराजस हा पारंपरिक सदरा-धोतर आणि लाल रंगाच्या उपरण्यात बोहल्यावर चढला. पारंपरिक पद्धतीने विराजस व शिवानीचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी मोजक्या लोकांची उपस्थिती होती.

विराजस व शिवानी यांनी आपल्या लग्नात दाक्षिणात्य पेहराव केला होता. शिवानीने सुंदर कांजीवरम साडी नेसली होती. या साडीत ती कमालीची सुंदर दिसत होती.

लग्नानंतर विराजस व शिवानी यांनी खास फोटोशूट केलं. त्याचे फोटोही समोर आले आहेत. हा फोटो शिवानी व विराजस आयुष्यभर सांभाळून ठेवतील.

एकमेकांत हरवलेलं कपल. होय, हा फोटो पाहून असंच म्हणावं लागेल. या फोटोत विराजस शिवानीच्या डोळ्यांत हरवला आहे.

लग्न हा आयुष्यातला अविस्मरणीय क्षण. पारंपरिक पद्धतीने विराजस व शिवानीचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी मोजक्या लोकांची उपस्थिती होती.