Photos: सुप्रिया पिळगांवकरांचं माहेरचं घर पाहिलंत का? पाहा कशी आहे महागुरुंची सासुरवाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 04:57 PM2023-08-17T16:57:28+5:302023-08-17T17:07:21+5:30

Supriya pilgaonkar: तुम्ही पाहिलं का सुप्रिया पिळगांवकरांचं माहेरचं घर कसं आहे ते?

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पिळगांवकर. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

मालिका, सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत आल्या आहेत.

सुप्रिया पिळगांवकर यांनी अशीही बनवाबनवी, नवरी मिळे नवऱ्याला, माझा पती करोडपती अशा कितीतरी सिनेमांमध्ये काम करुन त्यांनी लोकप्रियता मिळवली.

सुप्रिया सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्यांची कायम चर्चा रंगते.

अलिकडेच सुप्रिया यांच्या माहेरी सचिन पिळगांवकर यांना अधिकाचं वाण देण्यात आलं. या निमित्ताने सुप्रिया यांच्या माहेरचं घर पहिल्यांदाच नेटकऱ्यांनी पाहिलं.

सुप्रिया यांचं माहेर सधन असून त्यांनी अत्यंत सुंदररित्या सजवण्यात आलं आहे.

या घरामध्ये देवदेवतांच्या अनेक मुर्त्या, फोटो दिसून येतात.

सुप्रिया यांच्या माहेरचं घर प्रशस्त आणि मोठं आहे.

उत्तम रंगसंगतीचा विचार करुन या घराला रंग देण्यात आला आहे.

सुप्रियाच्या घरी देवाधर्माचं खूप केलं जातं. त्यामुळे वरचेवर त्यांच्याकडे पूजाआर्चा केली जाते.

प्रत्येक कोपरा सुबरित्या आणि विचारपूर्वक सजवला आहे.