लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचा नाद खुळा, तिच्या ग्लॅमरस फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 04:19 PM2022-07-08T16:19:34+5:302022-07-08T16:25:44+5:30

Laxmikant Berde's Daughter Swanandi Berde: अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

नुकतेच स्वानंदी बेर्डेने ब्लॅक ड्रेस आणि व्हाइट पफचे स्लीव्ज असलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या ड्रेसमध्ये स्वानंदीने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले आहे.

स्वानंदी बेर्डेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते.

स्वानंदी बेर्डेच्या इन्स्टाग्रामवर तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.

स्वानंदी बेर्डे हिने तिचे वडील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलांवर पाऊल टाकत सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.

विशेष बाब म्हणजे, लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकातून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली आहे.

धनंजय माने इथंच राहतात या नाटकातून स्वानंदीने रंगभूमीवर पदार्पण केले. तसेच तिचा रिस्पेक्ट हा चित्रपट नुकताच रिलीज झाला.